Last Updated on January 13, 2023 by Piyush
Surat-Chennai Expressway: राज्यात तसेच देशभरात अनेक राष्ट्रीय महामार्गांचे काम जोरात सुरू आहे. गुजरात आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा असाच एक मोठा प्रकल्प आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांतून जात आहे. हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक आणि सिन्नर या सहा तालुक्यांमधून जाणार आहे.
हा महामार्ग राज्यातील नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातून जाणार आहे. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक आणि सिन्नर या सहा तालुक्यांतील जमीन संपादित करायची आहे. भविष्यात या महामार्गावरून नाशिक-सुरत हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण होणार आहे.

बीड, धाराशिव, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांची आणि शेतकऱ्यांचे नावे पाहण्यासाठी येथे क्लीक करा
नाशिक ते सोलापूर हे अंतर 50 किलोमीटरने कमी होणार आहे. या प्रकल्पाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत केले जाणार असले तरी आवश्यक जमीन संपादित करण्याची जबाबदारी राज्याच्या महसूल विभागाला घ्यावी लागणार आहे.
सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी दाखल केलेले दावे आणि हरकती महिन्याच्या अखेरीस निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांनी सोमवारी सरकारी यंत्रणांना दिला आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासूनच या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत एक हजार 270 किमी लांबीचा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्प उभारला जात आहे.

बीड, धाराशिव, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांची आणि शेतकऱ्यांचे नावे पाहण्यासाठी येथे क्लीक करा
जिल्हा प्रशासनाने नाशिक, निफाड, सिन्नर आणि दिंडोरी या चार तालुक्यांतील भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत बाधित शेतकरी व स्थानिक नागरिकांनी अधिक मोबदला मिळणे, भूसंपादन करताना संपूर्ण क्षेत्र घेणे, जमिनीचे योग्य मोजमाप करणे आदी काही हरकती व सूचनाही नोंदविल्या असल्याचे अधिकाऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. जानेवारीअखेर सर्व दाखल दावे निकाली काढण्यात यावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी सहाही तालुक्यांचे महसूल अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
असा असणार आहे महामार्ग
हा महामार्ग 6 लेनचा करण्याची योजना असून या महामार्गाची रुंदी 70 मीटर होणार आहे, मात्र भविष्याचा वेध घेता या महामार्गासाठी 100 मीटरपर्यंतची जमीन संपादित केली जात आहे. साधारणपणे डिसेंबर 2025 पर्यंत या रस्त्याचे बांधकाम पूर्ण होईल अशी सरकारला आशा आहे. यातील सुरत – नाशिक – अहमदनगर या 290.70 किलोमीटर च्या पहिल्या टप्प्यासाठी DPR देखील तयार करण्यात आला आहे.
