बॉक्समध्ये खेकड्याची शेती करणारा शेतकरी । Farmers Success Stories

Farmers Success Stories : आपल्या महाराष्ट्राला 720 किमी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. 70 खाडी या किनारपट्टीला जोडतात. काही ठिकाणी प्रदूषणाचा अपवाद वगळता, या भागाचा वापर विविध प्रकारच्या निमखाऱ्या पाण्यातील माशांच्या शेतीसाठी केला जातो. निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी, मासे, खेकडे संवर्धनाचे प्रकल्प इथे सुरू आहेत. यापैकी खेकडा हा प्रमुख उत्पन्न मिळवून देणारा घटक आहे. या खेकड्याला स्थानिक तसेच प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी आहे. मात्र सध्या खेकडा हा मोठ्या प्रमाणात मिळत नाही.

यामुळे यावर तोडगा म्हणून एक अनोखा प्रयोग वसईतील भुईगाव येथील विकास वाजे यांनी केला आहे. विकास वाजे हे आधुनिक पद्धतीने खेकड्याची शेती करत आहेत. आयटीआयमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकासने महिंद्रा आणि पार्लेसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काम केले. पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून त्यांनी 2016 मध्ये खेकड्याची शेती सुरू करण्याचा निर्णय घेतला.

वर्टिकल बॉक्स क्रॅब फार्मिंगचा वापर करून विकासने खेकडा शेतीत आधुनिकतेची भर घातली. सध्या विकासडे 1000 खेकडे असून त्यांची महाराष्ट्रासह परदेशात निर्यात केली जाते. हा व्यवसाय सोपा नाही, त्यासाठी मेहनत आणि संयम आवश्यक आहे. तेव्हा यात यश मिळू शकते, असे विकास वाजे यांनी सांगितले. त्यांना ही हटके संकल्पना कशी सुचली? त्यांचा एकूण अनुभव काय आहे? याबाबत त्यांनी काय सविस्तर माहिती दिली हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा.

खेकड्याची शेती कशी केली जाते?

  • तलाव पध्दतीने
  • खाडीमध्ये बंदिस्त पध्दतीने (पेन कल्चर)
  • तलावांमध्ये बंदिस्त तरंगत्या क्रेट्समध्ये
  • व्हर्टिकल बॉक्स फार्मिंग

वाचा : मुंबईत घरांच्या किमती कमी करूनही प्रतिसाद नाहीच, घराची रक्कम थेट 27 लाख रुपयांपर्यंत

Leave a Comment