आरोग्य विभागात रिक्त पदासाठी भरती सुरू! 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी । Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024

Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 : शासकीय अनुदान प्रस्थावित केंद्र महात्मा गांधी आरोग्य सेवा केंद्र आणि व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्रासाठी खालील विविध नवीन रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज सादर करावेत असे आवाहन या संस्थे मार्फत करण्यात येत आहे. 10वी, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांना आरोग्य विभागांतर्गत नोकरी मिळण्याची उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करा आणि तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नोकरी मिळवून देण्यासाठी ही जाहिरात त्यांना पाठवून मदत करा. प्रस्थापित केंद्राकरिता रिक्त पदे भरण्यासाठी शासकीय अनुदान जाहीर करण्यात आले आहे. महात्मा गांधी हेल्थ केअर सेंटर आणि व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. संपूर्ण जाहिरात आणि सविस्तर माहिती खाली दिली आहे.

◾भर्ती विभाग: महात्मा गांधी हेल्थ केअर सेंटर आणि व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्राने जाहिरात जारी केली आहे.
◾भरतीचा प्रकार: आरोग्य विभागांतर्गत नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव: शिपाई, चौकीदार, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ड्रायव्हर, वॉर्डबॉय, नर्स, क्लर्क, लॅब टेक्निशियन, योग ◾शिक्षक, केंद्र प्रमुख, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता: 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्ण झालेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचा.)
◾भरतीची जाहिरात आणि अधिक माहिती खाली दिली आहे.

सर्व पदांची व्यावसायिक व शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
केंद प्रमुखएम.एस.डब्ल्यु किंवा पदवीधर
वैदयकीय अधिकारीबी.ए.एम.एस/बी. एच. एम. एस
औषध निर्माताडी. फार्म / बी. फार्म
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅवटेकनिशिअम)सी.एम.एल.टी/डी.एम.एल.टी
परिचारिका/नर्सए.एन.एम/जी.एन. एम
लिपिक/योगा शिक्षकपदवीधर किंवा बी. पी. एड
आ. सेवक/आ. सेविका10 वी पास /12 वी पास
शिपाई/वा. चालक/वॉचमन10 वी पास
Mahatma Gandhi Arogyaseva Kendra Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for immediate filling up of the following various new vacancies for Mahatma Gandhi Arogya Seva Kendra and De-addiction Rehabilitation Centre, a Government Grant established centre.
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन मोडद्वारे अर्ज आमंत्रित केले जातात. वयोमर्यादा: 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टाईप करून पाठवावा. प्रक्रिया शुल्कासाठी रु. 900/- आणि इतर मागासवर्गासाठी रु 500/- सोबत मनीऑर्डर किंवा DD डिमांड ड्राफ्ट काढून अर्ज यशराज सामाजिक संस्था पुणे यांच्या नावाने काढावा आणि पोस्टाने पाठवावा. शुल्कासह न पाठवलेले अर्ज नाकारले जातील.

मुलाखतीची वेळ आणि तारीख लवकरच कळवण्यात येईल. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्जावर पासपोर्ट फोटो लावलेला असावा. शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आवश्यक आहे. अर्जदाराने चुकीचे/बनावट/खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकले जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2024 आहे. अर्ज करण्याचा पत्ता: महात्मा गांधी आरोग्यसेवा केंद्र आणि व्यसनमुक्ती केंद्र पाबळ ता.शिरूर जि. पुणे पिन. 412403

वरील दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. वर दिलेली संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतरच पुढे जा. अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक पहा.

वाचा : शालेय शिक्षण व क्रीडा विभागात बंपर भरती ! Maharashtra Education Department Bharti 2024

Leave a Comment