Cidco Lottery : मुंबईत घरांच्या किमती कमी करूनही प्रतिसाद नाहीच, घराची रक्कम थेट 27 लाख रुपयांपर्यंत

Cidco Lottery : शहरात स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, काही लोकांसाठी, आर्थिक अडचणींमुळे ते स्वप्न पूर्ण करणे अशक्य होते. तसेच आता सिडकोने घरांच्या किमतीत (mumbai 2 bhk flat price) मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. सिडकोने जारी केलेल्या अनेक निवासी प्रकल्पांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नवी मुंबई आणि परिसरातील गृहनिर्माण प्रकल्पांमुळे अनेकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. सिडकोने घरांच्या किमती 6 लाख रुपयांनी कमी केल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी सिडकोने नवी मुंबईतील उलवे परिसरात गृहनिर्माण योजना जाहीर केली होती. त्यानंतर या घरांची किंमत 35 लाख 30 हजार रुपये निश्चित करण्यात आली. मात्र घरांच्या वाढत्या किमतीवर नाराजी व्यक्त करत अर्जदारांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच मदतीची याचना केली आहे.

या घरांच्या किमती 6 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. त्यामुळे घराची किंमत थेट 29 लाख 50 हजारांवर आली. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मिळालेल्या अडीच लाख रुपयांच्या अनुदानाची भर पडल्यास घराची रक्कम थेट 27 लाखांपर्यंत पोहोचते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे ही रक्कम एवढ्या मोठ्या फरकाने कमी होऊनही अर्जदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

सोडत प्रक्रियेत यशस्वी अर्जदारांनी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न दिल्यामुळे सिडकोसमोर आता अडचणी वाढत आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या अर्जदारांनी घर खरेदीची तयारी दाखवली आहे. त्यांची संख्या अत्यल्प असल्याने भविष्यात ही घरे सिडकोकडून नाकारली जाण्याची शक्यता आहे. जर घरे नाकारली गेली तर ते पुनर्विक्रीसाठी उपलब्ध करून देतील का? असा प्रश्न पडतो. तसे असल्यास योजनेला कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणे महत्त्वाचे आहे.

बामणडोंगरी येथील घरांचे दर 6 लाख रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. याबाबत अर्जदारांनाही माहिती देण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाला महिना उलटूनही ग्राहकांनी या घरांबाबत उत्साह दाखवलेला नाही. त्यामुळे सिडको यावर नवा तोडगा काढते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा : मुंबईत महिलांच्या नावे फ्लॅट खरेदी करणे फायद्याचे! महाराष्ट्र सरकारची नवीन योजना | Mumbai flat

Leave a Comment