म्हाडाचा घरांच्या विजेत्यांना दिलासा, घरांच्या किंमतीत ‘इतक्या’ रुपयांची कपात!

मुंबई : म्हाडाच्या 2018 सोडतीतील कोकण विभागातील बाळकुम येथील प्रकल्पातील संकेत क्रमाक 776 मधील गृहनिर्माण योजनेच्या 68 लाभार्थ्यांना म्हाडा प्राधिकरणाने अखेर दिलासा दिला आहे. बाळकुममधील येथील मध्यमवर्गीय गटातील घरांच्या किमती 5 लाख 41 हजार 284 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अशा स्थितीत आता या 68 लाभार्थ्यांना बाळकुममधील घरासाठी 54 लाख 33 हजार 516 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हाडाने 68 लाभार्थ्यांना दिलासा दिला असला तरी त्याच योजनेतील 125 लाभार्थींच्या घराच्या किमती कमी करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या विजेत्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.

2018 मध्ये कोकण मंडळाने 9018 घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीत बाळकुम गृह योजनेत संकेत क्रमांक 276 अंतर्गत 184 घरांचा समावेश करण्यात आला. ही घरे मध्यमवर्गीयांसाठी होती. महत्त्वाचे म्हणजे 194 घरांपैकी 125 घरे लॉटरी अर्जदारांसाठी तर उर्वरित 69 घरे कोकण मंडळातील जुन्या लाभार्थ्यांसाठी होती. कोकण मंडळाने 2000 ते 2002 ते 2006 दरम्यान जाहिरात देऊन घरांसाठी अर्ज मागवले. यासाठी 76 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 69 अर्जदार पात्र झाले. परंतु पात्र अर्जदारांना म्हाडाने प्रत्यक्षात बाळकुममध्ये घरे दिली नाहीत. या लाभार्थ्यांना अखेर 2018 च्या सोडतीतील संकेत क्रमांक 276 मध्ये समाविष्ट करण्यात आले.

वाचा : मुंबईत घरांच्या किमती कमी करूनही प्रतिसाद नाहीच, घराची रक्कम थेट 27 लाख रुपयांपर्यंत

मंडळाने बाळकुममधील या घरांची लॉटरीत 43 लाख 45 हजार 236 रुपये विक्री किंमत निश्चित केली. पण 2022 मध्ये मंडळाने अचानक या घरांच्या किमतीत 16 लाख रुपयांनी वाढ केली. त्यामुळे घरांची किंमत थेट 59 लाख 74 हजार 800 रुपयांवर पोहोचली. याबाबत नाराजी व्यक्त करत विजेत्यांनी न्यायालयात धाव घेतली. प्रकरण प्रलंबित असताना कोकण मंडळाने जुन्या 69 लाभार्थ्यांच्या घराच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

वाचा : मुंबईत महिलांच्या नावे फ्लॅट खरेदी करणे फायद्याचे! महाराष्ट्र सरकारची नवीन योजना | Mumbai flat

125 विजेत्यांना दिलासा नाहीच

म्हाडाने अखेर 68 विजेत्यांना दिलासा देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. 69 लाभार्थ्यांपैकी एका लाभार्थ्याने घर नाकारले, आता 68 लाभार्थ्यांना 54 लाख 33 हजार 516 रुपयांच्या घरांचे वाटप करण्यात येणार आहे. विजेत्यांना हा मोठा दिलासा आहे. मात्र त्याचवेळी सोडतीतील 125 लाभार्थ्यांना म्हाडाने कोणताही दिलासा न दिल्याने ते नाराज आहेत. घरांच्या किमती खाली आणण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू असून न्यायालयाकडून आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास एका विजेत्याने यावेळी आमच्याशी बोलताना दिला.

वाचा : मुंबईत घरांच्या किमती कमी करूनही प्रतिसाद नाहीच, घराची रक्कम थेट 27 लाख रुपयांपर्यंत

Leave a Comment