हळदीला सोन्याचा भाव! क्विंटलला 61 हजार दराचा ऐतिहासिक विक्रम

सांगली : सांगली बाजारात हळद दराने सोने दराशी बरोबरी साधत क्विंटलला 61,000 दराचा ऐतिहासिक टप्पा बुधवारच्या सौद्यावेळी गाठला. आजच्या सौद्यात किमान 15 हजार 900, तर सरासरी 38 हजार 450 रुपये हळदीला प्रति क्विंटल दर मिळाला. मागील आठवड्यातच सांगली येथे हळदीने क्विंटलला 51,000 या दराचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला होता. केवळ आठ दिवसांतच हा विक्रम मोडला गेला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंत मार्केट यार्डात बुधवारी निघालेल्या हळद सौद्यामध्ये 61,000र रुपये प्रतिक्विंटल हा आजपर्यंतच्या इतिहासातील उच्चांकी दर मिळाला.

अरिहंत बाबू गुळण्णावर व बसाप्पा पराप्पा कोकटनुर या कर्नाटकातील (यरगट्टी, ता. अथणी) शेतकऱ्यांनी एन. बी. पाटील, शिरगावकर यांच्या अडत दुकानामध्ये विक्रीसाठी आणलेल्या या राजापुरी हळदीस हा विक्रमी दर मिळाला आहे. बाजार समितीचे परवानाधारक खरेदीदार मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी या हळदीची खरेदी केली. सध्या हळद या शेतीमालास उच्चांकी भाव मिळत असून, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

गुणवत्तेवर हळदीला चांगला दर मिळत असून, शेतकऱ्यांनी हळद शेतीमाल सांगलीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती मा. सुजयनाना शिंदे व सचिव महेश चव्हाण यांनी केलेले आहे.

मागील आठवड्यातच सांगली येथे हळदीने क्विंटलला 51,000 या दराचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला होता. केवळ आठ दिवसांतच हा विक्रम मोडला गेला आहे.

वाचा : मुंबईत महिलांच्या नावे फ्लॅट खरेदी करणे फायद्याचे! महाराष्ट्र सरकारची नवीन योजना | Mumbai flat

Leave a Comment