अबब! चक्क सव्वा फूट लांबीची मिरची, किलोला मिळतोय 1500 दर | Agriculture News

Agriculture News : अन्नातील मिरची हा महत्त्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे साखरेचा वापर अन्नात गोडवा आणण्यासाठी केला जातो, त्याचप्रमाणे मिरचीचा वापर अन्नात तिखटपणा घालण्यासाठी केला जातो. या मिरचीचे अनेक प्रकार आपण पाहिले आहेत. यामध्ये जाड मिरची, लवंगी मिरची, वेगवेगळ्या रंगाच्या मिरच्यांचा समावेश यात आहे. दिवसेंदिवस देशी मिरच्यांचे अनेक नवीन वाण विकसित होत आहेत. पण सव्वा फूट लांब असलेल्या मिरचीच्या देशी जातीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

मिरचीच्या या देशी वाणाला जव्हारी मिरची असेही म्हणतात. विशेष म्हणजे या मिरचीची लांबी एक ते दीड फूट आहे. या मिरचीची लांबी हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे. ही मिरची खायला मध्यम प्रमाणात तिखट असते. त्याचबरोबर या मिरचीला बासमती तांदळाच्या सुगंधी वासाप्रमाणेच वैशिष्ट्यपूर्ण वास असल्याने त्याला मोठी मागणी आहे.

किती मिळते उत्पादन?

लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी मिरचीचे उत्पादन सुरू होते. या काळी मिरीचे उत्पादन संकरित वाणांच्या तुलनेत कमी असले तरी किंमत चांगली आहे. पुढील वेळी लागवड करण्यासाठी याच मिरचीचे बियाणे वापरले जाऊ शकते.

किती मिळतो दर?

ही मिरची दीड फूट लांब असल्याने तिचे अधिक आकर्षक आहे. तर वाळलेल्या मिरचीचा भाव 700 ते 1500 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे ही मिरची शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. मिरचीची ही देशी जात असल्याने यावर रोगाचा प्राधुर्भाव होत नाही.

हे पण वाचा : बॉक्समध्ये खेकड्याची शेती करणारा शेतकरी । Farmers Success Stories

Leave a Comment