ग्रामीण महिलांची स्वावलंबनासाठी भाजी विक्री


Last Updated on December 19, 2022 by Vaibhav

विक्रमगड : महागाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांना संसाराचा गाडा ओढताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर उपाय म्हणून घरी बसून राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहून रोजगार मिळवण्याचा प्रयत्न येथील आदिवासी समाजातील महिलांनी विक्रमगड बाजारपेठेतील वाटेवर (रस्त्यांवर) नगरपंचायतीच्या जागेवर बसून भाजीपाला, फळविक्री सुरू केली आहे.

या त्यांच्या प्रयत्नात महिलांना चांगला आर्थिक फायदा होत आहे. दररोज वाढणाऱ्या महागाईला आवर घालण्यास शासनाला अपयश येत असले तरी महागाईच्या नावे बोटे मोडत न बसता विक्रमगड तालुक्यातील अनेक महिलांनी विक्रमगड बाजारपेठेतील रस्त्यावर गावठी वांगी, कारली, भेंडी, तिखट मिरची, काकडी, आळूची पाने, टोमॅटो, केळी, पेरू यांसह पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक, शेपू यांसारख्या भाजीपाज्यांचे वाटे लावून रोजगार निर्मिती करून आपल्या प्रपंचाचा गाडा ओढत आहेत.

हे वाटे पाच ते दहा, वीस, तर व पालेभाज्यांचे दर सरासरी १ जुडीस १० रुपयांपर्यंत असून स्वस्त व चांगल्या प्रतीची गावठी ताजी भाजी मिळत असल्याने ग्राहकही आमच्याकडील भाजीचे वाटे सहज खरेदी करतात. खेडेगावातून येणारी ताजी गावठी भाजी आम्ही विकत घेऊन त्याचे वाटे करून विक असल्याने किलो मागे मेहनतीचे फळ मिळते. त्यातून दिवसाला चांगला अर्थाजन मिळत असल्याच्या भावना भाजी विक्रेत्या महिलांनी व्यक्त केली.

हेही वाचा: कापसाच्या भावात घसरण, पहा आजचे ताजे दर