धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस पुन्हा सुरू करा : पटोले


Last Updated on December 20, 2022 by Vaibhav

नागपूर महाविकास आघाडीचे सरकार असताना धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. पण शिंदे-फडणवीस सरकारने ते बंद करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. सध्या शेतकरी अडचणीत असून, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस पुन्हा सुरू करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी पटोले बोलत होते. पटोले म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: एक नंबर! सांगलीच्या दोघा भावांनी शोधली द्राक्षांची नवी जात, केंद्र सरकारचे पेटंटही मिळालं