It’s Time For Tulips : शनिवारी हॉलंडच्या अॅमस्टरडॅममध्ये ‘नॅशनल ट्यूलिप डे’ (National Tulip Day) साजरा केला गेला. या अनोख्या कार्यक्रमाने डच लोक ट्यूलिप सीझन सुरू झाल्याचा आनंद साजरा करतात. ट्यूलिप हे हॉलंडचे (नेदरलँड) सर्वांत प्रसिद्ध फूल आहे (The tulip is one of the most famous flowers in the Netherlands) अन् बहुतेकदा या देशाचे प्रतीक म्हणूनही वापरले जाते.

कोरोनाचे सावट सर्वत्र जगभर पसरलेले असताना प्रत्येक देशाने विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन अन् नियमावली जाहीर केली आहे. जरी या महामारीच्या काळांत आपल्या जीवनातल्या घडामोडींवर निर्बंध लागले आहेत, तरीही निसर्ग हा आपले काम चोख बजावत असतो आणि फुलांच्या फुलण्यावर मात्र कोणतेही निर्बंध नसतात. वेळ आली की बहरणारच सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात बहुतेकांचे लक्ष आपल्या फोनमध्ये लागलेले असते. पण ज्या वेळी तुम्ही नेदरलँडमधील ट्यूलिप्स (tulip) पाहाल तेव्हा ट्यूलिप्स हा जणू दागिन्यांचा खजिना असल्याचं जाणवेल.
‘Tulips were a tray of jewels’- E.M. Forster, ‘Howards End’ 1910 यांच्या वाक्याची प्रचीती येईल आणि जर तुम्ही नेदरलँडमध्ये ट्रेनमध्ये असाल तेव्हा तर तुमचा फोन पाहण्यात तुम्ही नक्कीच कमी वेळ घालवाल.

नेदरलैंड हे ट्यलिप्ससाठी ओळखले जाते. काही काळातच डच लोकांसाठी ते संपत्तीचे प्रतीकही बनले. ट्यूलिपच्या लोकप्रियतेचा संपूर्ण देशावर इतका परिणाम झाला आहे की, सर्वत्र ट्यूलिपची चिन्हे पेंटिंग आणि उत्सवांत दृश्यमान झाली. अनेक डच उद्योजकांनी तर या प्रचाराला आर्थिक संधी म्हणून ओळखले, ज्यामुळे ट्यूलिप बल्बचा (फुले) व्यापार झाला.
जानेवारीत जरी आपल्याला फुललेल्या ट्यूलिप्सचा आनंद लुटता येत नाही, पण जानेवारीच्या तिसऱ्या शनिवारी १५ जानेवारी २०२२ ला अॅमस्टरडॅममध्ये नॅशनल ट्यूलिप डे’ साजरा केला गेला. या अनोख्या कार्यक्रमाने डच लोक ट्यूलिप सीझन सुरू झाल्याचा आनंद साजरा करतात. ट्यूलिप हे हॉलंडमधील सर्वात प्रसिद्ध फूल आहे आणि बहुतेकदा नेदरलँडचे प्रतीक म्हणूनही वापरले जाते.
चारशेहून अधिक वर्षांपासून ट्यूलिप हॉलंडशी जोडलेले आहे. अधिकृतपणे, ट्यूलिप पर्शियातील एक जंगली फूल आहे. सोळाव्या शतकात ट्यूलिप तुर्कीमार्गे नेदरलँडमध्ये आले. मलतः ऑटोमन साम्राज्यात (सध्याचे तुर्की) ट्यूलिप्सची लागवड केली जात होती. जेव्हा कॅरोलस क्लुसियसने १५९२ मध्ये ट्यूलिप्सवर पहिले मोठे पुस्तक लिहिले तेव्हा ते इतके लोकप्रिय झाले की त्याच्या बागेवर छापे टाकण्यात आले आणि नियमितपणे बल्ब चोरीला गेले. जसजसे डच सुवर्णयुग वाढत गेले, तसतसे हे। वक्र आणि रंगीबेरंगी फूलही वाढले. प्रत्येक

रंगाच्या ट्यूलिपचा पुन्हा सखोल अर्थ आहे. जसे की, लाल ट्यूलिप्स (प्रेम), गुलाबी ट्यलिप्स (काळजी आणि शुभेच्छा. पांढरे ट्यूलिप्स (शुद्धता, निर्दोष, क्षमा आणि आदर), जांभळे ट्यूलिप्स (रॉयल आणि पुनर्जन्म), पिवळ्या ट्यूलिप्स (चमक, सूर्यप्रकाश आणि वसंत ऋतूची सुरुवात) हॉलंडमध्ये ट्यूलिप्स पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना एप्रिल आहे.
या वर्षी सर्वात सुंदर ट्यूलिप फील्ड असण्याची सर्वोत्तम संधी एप्रिलच्या मध्यापासून ते मे २०२२च्या सुरुवातीपर्यंत आहे. दुर्दैवाने, या वर्षीही कोरोनामुळे आपल्यावर अनेक निर्बंध आहेत. परंतु तुम्ही सोशल मीडिया अर्थात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्रिटर आणि वेबसाइट्सद्वारे डिजिटली ट्यूलिप्सचा आनंद घेऊ शकता. हॉलंडमधील ट्यूलिप्स पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे केउकेनहॉफ (Keukenhof)

केउकेनहॉफ हे सात दशलक्ष फुलांचे बल्ब असलेले उद्यान आहे. ज्याभोवती ट्यूलिप फील्ड आहेत. जे लिस्से, दक्षिण हॉलंड येथे आहे. नेदरलँडमधील बहुतेक ट्यूलिप फार्म फ्लेव्होलैंड प्रांतातील नूरडूस्ट पोल्डरमध्ये आहेत. हेग आणि लीडनच्या किनाऱ्यालगतची फ्लॉवर बल्च फील्ड उत्तरेकडील अल्कमारपर्यंत आहेत. परंतु महामारीमुळे, मागच्या वर्षी केउकेनहॉफला उद्यान उघडण्याची परवानगी नव्हती.
या साथीच्या काळात, आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. निसर्गात घालवलेला वेळ कधीही वाया जात नाही. एक लक्षात ठेवा, जंगलात वायफाय नसतं, पण तुम्हाला चांगलं कनेक्शन मिळेल हे निश्चित. – अॅड. प्रणिता देशपांडे हेग, नेदरलँड
शास्त्रज्ञांचा दावा – तुमचे डोळे पाहून कळेल, किती दिवस जिवंत राहाल