नाशिक: आडगाव शिवारात तीन घरफोड्या


Last Updated on December 6, 2022 by Vaibhav

नाशिक शहर व परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून शनिवारी (दि. ३) रात्री आडगाव शिवारात तिन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे ३ लाख ७० हजारांचा ऐवज चोरून नेला. त्यात रोकडसह सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हिरावाडीतील गायत्री अविनाश बस्ते (रा. भावबंद सोसा. रेशीमबंध लॉन्स शेजारी) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बस्ते कुटूंबिय शनिवारी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या खिडकीचे गज कापून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड, सोन्याचांदीचे दागिणे आणि इंटेल कंपनीचा सीपीयू असा सुमारे १ लाख ९२ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शांताराम शेळके करीत आहेत. दुसरी घटना कैलासनगर भागात घडली. भरत बारकू फड (रा. व्लासो हाईटस, रामाजनेय मंदिर, यमुना प्राईडच्या समोर)यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

फड व त्यांच्या इमारतीत राहणारे राजेश लाटे यांच्या बंद घराचे चोरट्यांनी कुलूप व सेफ्टी डोअर तोडून कपाटातील १ लाख ३० हजार रूपयांची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे व टिव्ही असा सुमारे १ लाख ७८ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाथरे करीत आहेत.हेही वाचा:नाशिक: बेरोजगार सेवा सोसायट्यांनाही 3 लाखांपर्यंत विनाटेंडर कामे