Mhada lottery 2023 : म्हाडाची डबल लॉटरी लागली तर दोन्ही घरं घेता येतात का, काय आहे नियम?


Last Updated on January 24, 2023 by Piyush

Mhada lottery 2023 : मुंबई, पुणे, नागपूर येथील म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी सुरू झाली आहे. ही नोंदणी 5 आणि 6 जानेवारीपासून सुरू झाली आहे. जर तुम्ही म्हाडासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला काही अटी आणि नियम माहित असणे आवश्यक आहे. याशिवाय म्हाडाने यंदाच्या सोडतीत काही बदल केले आहेत. यापूर्वी 21 कागदपत्रांसह काम केले जात होते, आता यासाठी 7 कागदपत्रांची आवश्यकता आहे

7 दस्तऐवज तुम्हाला नोंदणी दरम्यान सबमिट करणे आवश्यक आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही घरासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी अनामत रक्कम वाढवण्याचा विचार सध्या म्हाडा करत आहे. तसा प्रस्ताव कोकण मंडळाने दिला आहे. दलाली थांबवण्यासाठी म्हाडा या प्रस्तावावर विचार करत असल्याचे वृत्त आहे.

आता प्रश्न असा आहे की म्हाडात आधीच घर असल्यास तुम्ही अर्ज करू शकता का? एका कुटुंबातील दोन व्यक्ती म्हाडासाठी अर्ज करू शकतात का? दोघांनाही घर हवे असेल तर मिळेल का? त्यासाठीच्या अटी व शर्तीही आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील इतर दोन-तीन जणांनी म्हाडासाठी अर्ज केला आणि दोघांनाही घर मिळाले, तर तुम्हाला ते मिळेल का? याचं उत्तर आहे की तुमच्या नावावर जर घर नसेल तर तुम्हाला घर घेता येऊ शकतं. याचा अर्थ पती-पत्नी दोघांनी अर्ज केला असेल आणि दोघांनाही घर मिळाले असेल, तर दोघांपैकी एकाला नकार द्यावा लागेल.

मात्र आईच्या नावे आणि मुलाला घर लागलं तर मात्र दोघांनाही घर घेता येऊ शकतं. तसेच जर तुमचे मुंबईत म्हाडाचे घर असेल तर तुम्ही पुणे नागरपूरसाठी अर्ज करू शकता. मात्र आधी मुंबईत घर लागलं असेल आणि पुन्हा अर्ज केला तर मात्र तुमचा अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो.

वाचा : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या 56 कोटींचा निधी आला