Last Updated on November 21, 2022 by Ajay
Indonesia Earthquake: इंडोनेशियातील जकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यादरम्यान 20 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याचवेळी 300 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सियांजूरच्या प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन यांनी सांगितले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, केवळ एका रुग्णालयात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किमान 300 लोकांवर उपचार सुरू आहेत. इमारतींमध्ये अडकल्यामुळे बहुतेकांना फ्रॅक्चर झाले आहे. मृतांचा आकडाही वाढू शकतो.