औरंगाबाद : मकर संक्रांत झाल्यानंतरही थंडी कमी होण्यास तयार नाही. थंडीमुळे सध्या शहर गारठलेले असतानाच बाजारात फळांच्या दुकानावर बुधवारी लालबाग आंबा दाखल झाला. आंबे बघताच खवय्ये खरेदीसाठी सरसावले. ४०० रुपये किलोने आंबा विकल्या जात आहे, पण या आंब्याची गोडी हिवाळ्यात कशी येणार, असाही प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
फळांच्या राजाच्या स्वागतासाठी औरंगाबादकर सज्ज झाले आहेत. कधी एकदा कोकणातील हापूस आंबा येतो व त्याची पहिली चव चाखता येईल, अशी अवस्था अनेकांची झाली आहे.
मुंबई, पुण्याच्या बाजारात हापूस आला असला तरी, औरंगाबादमध्ये कोकणी हापूस येण्यास फेब्रुवारी उजडणार आहे. मात्र, त्या आधीच लालबागचा . आंबा अचानक बाजारात दाखल झाला. कर्नाटकमधून हा आंबा स्थानिक बाजारात आला आहे. हा आंबा शीतगृहातील शीतगृहातील असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेही थंडीत आंबा बेचव लागतो. जसजसा उन्हाचा तडाखा वाढेल तशी आंब्याची गोडी अधिक वाढत जाते. फेब्रुवारीपासून विविध राज्यातील आंबे बाजारात येतील तोपर्यंत खवय्यांना थोडा संयम बाळगावा लागणार आहे.
केशरला फळधारणा
मराठवाड्यातील प्रिय केशर आंबा सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. यंदा फुलोरा चांगला झाला. नैसर्गिक विघ्न न आल्यास केशर आंब्याचे एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात आगमन होईल. -सुशील बलदवा, केशर आंबा उत्पादक
चव खराब निघाली तर बघ…
एका फळ विक्रेत्यांनी सांगितले, आज पहिल्या दिवशी काही हौशी ग्राहकांनी आंबा खरेदी केला पण त्यांनी एक अट टाकली. ४०० रुपये किलोने आंबा नेतो पण चव खराब निघाली व बायको माझ्यावर रागावली तर दुप्पट पैसे परत द्यावे लागतील.
नवलच! येथे नवरदेवाचे कपडे विकत घेतले जातात…