पतीने गर्भवती पत्नीला दिले एचआयव्ही इंजेक्शन


Last Updated on December 20, 2022 by Vaibhav

एका व्यक्तीने आपली गर्भवती घटस्फोट देत नसल्याने एक भयंकर कृत्य केले. आपल्या कटात त्याने एका डॉक्टरला सामील केले. उपचारांच्या नावाखाली त्या डॉक्टरने सदर व्यक्तीच्या पत्नीला एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन दिले. जेव्हा या गर्भवती पत्नीला खऱ्या गोष्टी कळल्या तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिने पती व डॉक्टरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून पतीला अटक करण्यात आली आहे.

ताडेपल्ली भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, एम. चरण या व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी एका डॉक्टरकरवी एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन दिले. गर्भावस्थेत विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन घेतले तर ते आरोग्यासाठी उत्तम असते अशी भूलथाप त्याने आपल्या पत्नीला मारली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून लवकरच डॉक्टरवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. एचआयव्ही संक्रमित रक्त डॉक्टरने कुठून मिळविले याचाही पोलीस तपास करत आहेत.

हुंड्यासाठी छळ

एम. चरण हा आपल्या पत्नीला हुंड्यासाठी छळत होता. या दांपत्याला एक मुलगी आहे, पण त्यातील पतीला वंशाचा दिवा हवा होता.

मुलगा होत नसल्याने तो पत्नीला त्रास देत होता. त्याचे एका महिलेशी प्रेमप्रकरण असल्याचे पत्नीने पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्याने घटस्फोटाची केलेली मागणी पत्नीने धुडकावून लावली.

पीडित महिला एका वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेली होती. त्यावेळी केलेल्या रक्तचाचणीत ती एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले.

त्यामुळे हादरलेल्या महिलेने या प्रकाराबाबत आपल्या नातेवाइकांना सांगितले.

तिने सर्व घटनाक्रमाची उजळणी केली असता एका डॉक्टरने आपल्याला विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन दिले होते हे तिच्या ध्यानात आले. या इंजेक्शनद्वारेच शरीरामध्ये एचआयव्ही विषाणूंचा प्रवेश झाला असल्याचे निश्चित झाल्यानंतर तिने पती व त्या डॉक्टरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

हेही वाचा: तंदुरुस्तीसाठी शरीरासोबतच ब्रेन डिटॉक्सचीही गरज