मुंबई : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येत होणारी वाढ पाहता आता राज्यात कठोर निर्बंध लावण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, काल महाराष्ट्रातील सक्रिय कोरोना बाधितांची एकूण संख्या 11492 इतकी होती आणि आज ही संख्या 29 हजारावर जाण्याची शक्यता आहे. मुंबईत 1300 सक्रिय रुग्ण आहेत आज संध्याकाळी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. रुग्ण दुपटचीचं प्रमाण वाढत आहे. सक्रिय रुक्णांची संक्या दररोज ही 400 ते 500 होती पण आता ही संख्या 2000 च्या पुढे आज असण्याची शक्यता आहे.
मुंबईत दररोज 51 हजार चाचण्या केल्या जात आहेत. सध्या 2200 केसेस सापडत आहेत त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट 4 वर आहे. हा पॉझिटिव्हिटी रेट नक्कीच चांगला नाहीये. यामुळे आपल्याला कााळजी घेण्याची आवश्यकता आहे. दिल्लीत बऱ्यापैकी निर्बंध लावण्यात आले आहेत. मॉल्स, रेस्टॉरंटवर निर्बंध लावण्यात आले आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
उपवास महाग; भगर ८०० ते हजार रुपये क्विंटलने महागली