Last Updated on January 5, 2023 by Vaibhav
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिडनी मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मार्को पेन्सेनच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मानस लँबुशेन याचा झेल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने पकडला. हा चेंडू जमिनीला लागून गेल्याचे रिप्लेत दिसत होते. मैदानी पंचाने मात्र लँबुशेनच्या निर्णयाबाबत तिसऱ्या पंचांचा आधार घेतला तिसऱ्या पंचांनी लॅबुशेनला नाबाद ठरविले.
दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनादेखील लॅबुशेन झेलबाद असल्याची खात्री होती; पण निर्णय घेताच त्यांचाही भ्रमनिरास झाला. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पुन्हा एकदा आयसीसीवर टीका केली. बेनने ट्रिट करीत म्हटले की, सॉफ्ट सिग्नलपासून आता तरी मुक्त व्हायला हवे मैदानी पंच जेव्हा निर्णय तिसऱ्या पंचकडे सोपवितात, तेव्हा सर्व तंत्रज्ञान जवळ बाळगणाऱ्या तिसऱ्या पंचाला तो निर्णय घेऊ द्या. सर्व वाद नेहमी सॉफ्ट सिग्नल सभोवताली फिरत राहतो. माझे मत हे निर्णयावरील टिप्पणी मानू नये…
हेही वाचा: बीसीसीआयने महिला आयपीएल संघांच्या मालकीसाठी मागवल्या निविदा