थंडीमुळे द्राक्षबागांना भुरीचा धोका


Last Updated on November 24, 2022 by Vaibhav

शेतकरी चिंतित: वाढ खुंटण्याची शक्यता; उपाययोजना सुरू

नाशिक वाढत्या थंडीमुळे जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. थंडीमुळे काही भागांत द्राक्ष बागांवर भुरी रोगाचा प्रार्दुभाव होऊ लागला आहे. थंडी जर अधिक वाढली तर वाढ खुंटण्यांची शक्यता वर्तविली जात आहे. गहू, हरभन्यासाठी थंडी पोषक असली तरी द्राक्ष उत्पादकांची मात्र चिंता वाढविणारी ठरत आहे.बागायतदारांनी या काळात वेलींना पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. जिल्ह्यात द्राक्ष बागांचे क्षेत्र मोठे आहे. सध्या बहुतेक ठिकाणी बागा फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी मणी लागवडीचा काळ सुरू झाला आहे.

थंडी पडल्यानंतर द्राक्ष बागांवर त्याचा लगेचच परिणाम दिसण्यास सुरुवात होते. ज्या बागा फुलोऱ्यात आहेत त्या बऱ्याच काळ याच अवस्थेच राहतात. ज्यांना मणी लागले आहेत त्यांच्या मण्यांची वाढ थांबते. घडांची वाढ मंदावते. ज्या मण्यांमध्ये पाणी उतरण्याची स्थिती आहे अशा मण्यांना थंडीमुळे क्रकिंग होण्याचा धोका असतो. तर थंडीमुळे लेट छाटणी झालेल्या द्राक्ष वेलीच्या शेंडा वाढीवर परिणाम होतो. अनेकवेळा थंडीमुळे वेलींचे कार्य मंदावते. पानांची कार्यक्षमता मंदावते काही बागांवर भुरी या रोगांचा प्रार्दुभाव होतो.

थंडीपासून वाचविण्यासाठी द्राक्षबागा शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून वेगवेगळ्या औषधांची फवारणी केली जात आहे. थंडीच्या काळात बागेला पाण्याचा अधिक ताण देऊ नये त्याचबरोबर चांगल्या प्रकारच्या सीवीडची फवारणी करावी असा सल्ला अनुभव शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.

बांगलादेशात होणारी निर्यात काहीशी मंदावली

अर्लीला मिळतोय ८०-९० रु किलोचा दर अलीं द्राक्षांवर सध्या तरी थंडीचा १ फारसा परिणाम जानवत नाही. थंडीमुळे माल चांगला झाला असून सध्या या मालाची खुडणी सुरु आहे. दिल्ली, कोलकाता आदी भागांत माल पाठविला जात असून त्यास ८०-९० रुपये किलोचा दर मिळत आहे. काही शेतकऱ्यांच्या द्राक्ष मालाची निर्यातही होत असून त्यालाही चांगला दर मिळत आहे.

बांगलादेशात आलेल्या आर्थिक संकटामुळे द्राक्ष निर्यातीवर परिणाम झाला आहे. दरवर्षी या काळात बांगलादेशला मोठ्या प्रमाणात माल जात असतो. यावर्षी मात्र तेथील शासनाने आयात शुल्क वाढविल्यामुळे भारतीय द्राक्षांना काहीसा फटका बसला असल्याचे द्राक्ष बागायतदार कृष्णा भामरे यांनी सांगितले. त्यामुळे बांगलादेशात होणारी निर्यात काहीशी मंदावली आहे.

थंडीमुळे द्राक्ष बागांना धोके निर्माण होतात. घड फुगवणीवरही परिणाम होतो. याकाळात द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष बागेच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. पाण्याचा जास्त ताण होणार नाही याची दक्षता घेतानाच चांगल्या प्रतीच्या सीवीडची फवारणी करून द्राक्ष बागांची काळजी घ्यावी. गणेश मोरे, शेतकरी, पिंपळगाव ब.

हेही वाचा: कांदा पुन्हा 14 रुपयांनी घसरला..! आज एपीएमसीमध्ये मिळतोय इतका रुपये दर