Cotton Farmer: शेतकरी भावांनो, थोडं थांबा ! ‘पॅनिक सेल’ करू नका


Last Updated on December 19, 2022 by Piyush

नागपूर : सलग दुसऱ्या वर्षी देशभरात कापसाचे उत्पादन घटण्याचा अंदाज (Cotton production predicted to decline) असला आणि बाजारात आवक कमी असली तरी भावात (cotton rate) मात्र सातत्याने घसरण होत आहे. अशास्थितीत नंतर आणखी भाव पडतील, या भीतीने काही शेतकरी (farmer) साठवून ठेवलेला कापूस विक्रीसाठी (cotton sales) बाजारात आणत आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन ‘पॅनिक सेल’ (panic cell) अर्थात भीतीपोटी विक्री करू नये, नवीन वर्षात भाव वाढण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सन २०२२ – २३मध्ये एकूण ३७५ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज होता. नंतर ३४५ लाख गाठी उत्पादन होणार असल्याचे सीएआयने स्पष्ट केले आहे.

cotton 1 3

फार थोड्या जिनिंग प्रेसिंग सुरु

एक जिन पूर्ण क्षमतेने चालवायला रोज किमान एक हजार क्विटल कापूस लागतो. रोज १५० ते २०० क्विटल कापूस मिळत असल्याने आठवड्यातून केवळ एक ते दीड दिवस जिन चालवावा लागतो. सध्या देशातील फार थोडे जिनिंग प्रेसिंग सुरु असल्याचे सांगण्यात आले.

भारतासोबत जागतिक पातळीवर कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याचे संकेत आहेत. कमी उत्पादनामुळे दर वाढू शकतात. शेतकऱ्यांनी घाई न करता गरजेपुरता कापूस विकावा. उर्वरित कापूस टप्प्याटप्प्याने विकावा. – गोविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र.

सध्या चढ-उतार असला, तरी कापसाचे दर स्थिर राहतील. आवक वाढली तर दर कोसळतील. सरकीचे दर कमी झाल्याने कापसाच्या दरावर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी न घाबरता बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवावी. – विजय निवल, माजी सदस्य, कॉटन अॅडव्हायझरी बोर्ड.

कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/12/2022
भोकरक्विंटल89818584508318
सावनेरक्विंटल2600830085518400
किनवटक्विंटल112790081008000
राळेगावक्विंटल2000820084208300
सिरोंचाक्विंटल5800083008200
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल55820084008400
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल415830084008350
बार्शी – टाकळीएचडीएचवाय – लांब स्टेपलक्विंटल152820082008200
जाफराबादहायब्रीडक्विंटल70850088008610
उमरेडलोकलक्विंटल452827083808300
देउळगाव राजालोकलक्विंटल150800082558100
वरोरालोकलक्विंटल406815084108300
काटोललोकलक्विंटल100810085008300
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल260850085758540
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1300820085658380
18/12/2022
भद्रावतीक्विंटल21827583008288
सोनपेठएच – ६ – मध्यम स्टेपलक्विंटल72850086508600
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल957800085008200
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल190825084008300
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल38830084008350
काटोललोकलक्विंटल120800085008300
भिवापूरवरलक्ष्मी – मध्यम स्टेपलक्विंटल301800083008150

वाचा : कुक्कुट खाद्यात होणार आता प्रथिनेयुक्त अळ्यांचा वापर