खा किंवा घेऊन जा ! – बेन्टो बॉक्स !!


Last Updated on December 16, 2022 by Vaibhav

इटालियन, चायनीज आणि थायसारख्या आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांच्या अफाट लोकप्रियतेनंतर भारतात कोणत्या देशांचे पदार्थ खाद्यप्रेमींना भुरळ घालत आहेत, माहित आहे? कोरियन आणि जपानी, कोरियन पदार्थाच्या लोकप्रियतेमागे अनेक कारणं आहेत. मुळात कोरियन संस्कृती सध्या अनेक पातळींवर लोकप्रिय आहे. उदाहरणार्थ कोरियन संगीत, कोरियन सिरियल्स तसेव कोरियन बार्बेक्यू आणि रामेन. जपानी पदार्थ आणि कोरियन पदार्थ अनेक बाबतीत वेगळे असले तरी एकमेकांच्या जवळ जाणारे आहेत. सुशी, किमची, रामेन असे शब्द नव्या पिढीच्या संभाषणात येत आहेत. याच शब्दांच्या बरोबरीने जेन झी एका नव्या शब्दाला रुळली आहे, तो म्हणजे बेन्टो बॉक्स.

चेन्टो बॉक्स हा मूळचा जपानी शब्द बेन्टो बॉक्स म्हणजे एका माणसाच्या जेवणाचा डबा, याचे वैशिष्ट्ये असे की, यात चव आणि न्यूट्रिशन यांचे संतुलन असते. प्रत्येक गोष्ट जरुरीपुरतीच असते, बेन्टो बॉक्स जपानमध्ये बाराव्या शतकापासून वापरात आहे. त्याचे स्वरूप वेगवेगळे होते.

कधी झाडांच्या पानातून, कधी बांबूतून, तर कधी कापडात बांधलेले जेवण एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचवले जाई, बांबूपासून तयार केलेल्या डब्यात ओनिगिरी किंवा भाताच्या गोळ्यासारखा जपानी पदार्थ प्रवासी नेत. हे बहुदा कोरडे जेवण असे. बेन्टोमध्ये नूडल्स किंवा भात, भाज्या, फळ वेगवेगळ्या कप्प्यात ठेवलेले असत. गरजेनुसार है कप्पे कमी जास्त असतात, काही फॅन्सी बेन्टोमध्ये तर चॉपस्टिक्सबरोबरच चक्क आईसपॅक्स, कटलरी, पेयाचे डवेपण असतात. बॉक्समध्ये तळलेले पदार्थपण असतात आणि ते कुरकुरीत राहण्यासाठी काळजीपूर्वक पॅक केले जातात. भातासारख्या पांढन्या रंगाच्या शेजारी रंगीत भाज्या किंवा फळे ठेवली जातात म्हणजे, पदार्थ फक्त पॅक करायचा नाही तर तो दिसायलापण सुरेख पाहिजे!

बेन्टो कुठे आणि कशा प्रकारे वापरला जातो त्यावरून त्याचे काही प्रकार ठरले आहेत. उदाहरणार्थ इकीबेन बेन्टो जपानी रेल्वेस्थानकांवर मिळतात. गेली कित्येक दशके जपानी प्रवाशांना प्रवासात सोबत करतात, तर होकावेन म्हणजे बेन्टो टेकआऊट रेस्टॉरंटमध्ये मिळणारे सेन्टो.. जपानी लोक बऱ्याचदा बाहेर जेवतात आणि देकआऊटमधून होकाचेन घेऊन ऑफिसला जातात.

हेही वाचा: नाताळच्या सुट्ट्यांत तारांकित हॉटेल्सना ग्राहकांची सर्वाधिक मागणी