शेतकऱ्यांकडून बैलाचाही होतो दशक्रिया विधी


Last Updated on December 20, 2022 by Vaibhav

पिंपळगाव खडकी : शेतकरी त्यांच्या पाळीव प्राण्यांवर किती प्रेम करतो ? याबद्दल फार काही वेगळे सांगण्याची गरज नाही. शेतकऱ्याच्या जीवनात बैलजोडीला वेगळंच स्थान असतं ? हे अधोरेखित करणारी एक घटना आंबेगाव तालुक्यात घडली आहे.

तो त्यांच्या शेतात राबायचा… औत ओढायचा… शेतशिवार हिरवंगार करण्यात आणि मालकाच्या नावाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्याच्या कष्टाचा मोठा वाटा होता. कुटुंबातील सदस्य असलेल्या त्याचा मृत्यू झाला. ‘बटयाच्या दुःखात लोटलेल्या कुटुंबाने कृतज्ञतेच्या भावनेतून दशक्रिया विधी केला. माणसाच्या मृत्यूपश्चात केले जाणारे सर्व धार्मिक आपल्या अश्रूंच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

शिवराम यांचे चिरंजीव गणेश, धनेश, सागर या तिघांना बैलगाड्यांचा छंद आहे. बैलांचा मुलांप्रमाणे सांभाळ करण्याचे संस्कार त्यांच्या वर झालेले आहेत.

या तिघांनी १० वर्षांपूर्वी बंट्या नावाचा बैल आणला होता. या बैलाने आंबेगाव, शिरुर, हवेलीसह सहा तालुक्यांमधील बैलगाडा शर्यतींमध्ये लौकिक मिळवला. त्याची ओळख ‘फायनल सम्राट’ अशीच झाली होती. त्याच्यावर हे तिघेही बंधू जिवापाड प्रेम करीत होते. त्याचा ५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. इंदोरे कुटुंबियांकडून दशक्रिया विधी करण्यात आला.

बैलाबाबत संवेदनशीलता….

पेटा या संस्थेने बैलगाडा शर्यतीवर लावण्यात आलेल्या केस चा निकाल लवकरात लवकर जाहीर करुन सरकारने देखील बैलगाडा शर्यती बिनशर्त सुरू कराव्यात अशी एकजुटीने मागणी करण्यात आली. इंदोरे कुटुंबियांनी बैलाबाबत दाखविलेली संवेदनशीलता आणि प्रेम पाहून अनेकजण हेलावून गेले होते.

हेही वाचा: ‘पीकपाणी, धन, धान्याची बरकत होऊ दे’ संत बाळूमामांच्या मेंढ्यांनी घातली खंडोबा मंदिराला अश्वासह प्रदक्षिणा