कापसाला येणार ‘अच्छे दिन’! गुजरात निवडणुकीमुळे बसतोय शेतकऱ्यांना फटका


Last Updated on December 4, 2022 by Piyush

जळगाव : स्थानिक प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये निर्बंध कडक केले आहेत. तसेच गुजरातमध्येही निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. चीनमधील निर्बंध हटण्याचे संकेत आणि गुजरातची निवडणुक अंतिम टप्प्यात असल्याने कापसाचा बाजार येत्या पंधरवाड्यात तेजीत येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बहुतांशी शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली नाही. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरुवातीला १४ हजारापर्यंतचा भाव दिला. नंतर हा भाव आठ ते नऊ हजारांवर आणून ठेवला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री करायला नकार दिला.

चीनमधील निर्बंधांची बाधा

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे तेथील सरकारने कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे अर्थकारणावर विपरित परिणाम झाला. त्यामुळे चीनकडून कापसाची मागणी मंदावली आहे. परंतु सरकारच्या निर्बंधांविरोधात चीनमधील जनता रस्त्यावर उतरली. अनेक ठिकाणी निदर्शने झाल्यानंतर चीन सरकारने काहीशी नरमाईची भूमिका घेतली आहे.

नागरिकांमधील वाढत्या रोषामुळे ग्वांगझ आणि चोंगकिंग या शहरांमधील निर्बंध सरकारने शिथिल केले आहेत. चीन सरकार इतरही शहरांमधील कोरोना निर्बंध शिथिल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनकडून कापसाची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत. त्याचा परिणाम म्हणून भारतातील कापसाला उठाव मिळू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत कापसाचे भाव प्रति क्विटल ३०० ते ५०० रुपये वाढण्याची शक्यता आहे.

वायदा बाजारात शांतता

गुजरातमध्ये निवडणुक सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनांची कसून तपासणी सुरु आहे. त्यामुळे रोकडचा हवाला घ्यायला सध्यातरी कुणीही इच्छुक नाही. तसेच गुजरातमध्ये कापूस पाठविल्यावर त्यापोटी येणाऱ्या रोकडचा प्रवासही जिकरीचा झाला आहे.

कारण प्रत्येक रस्त्यावर गुजरात महसुल व पोलीस प्रशासनाची गस्त सुरु आहे. त्यामुळे कुणीही रोकड आणण्याची हिंमत करताना दिसत नाही. तसेच महाराष्ट्रातील व्यापारीही तिकडे जायला तयार नाहीत. त्यामुळेही कापसाच्या बाजारात मंदी आहे, मात्र येत्या आठवड्यात गुजरातची निवडणुक संपणार आहे. त्यामुळे कापसाचे व्यवहार पूर्ववत होतील, असे व्यापारी सांगतात.

मोठ्या प्रमाणात भाव वाढतील, अशी शक्यता सध्यातरी नाही. मात्र पाचशे रुपयांपर्यंत साधारणतः बाजार भाव वाढेल, असे सध्यातरी सांगता येईल. -प्रदीप जैन, जिनींग व्यावसायिक,

कापूस बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/12/2022
सावनेरक्विंटल2550865087508700
राळेगावक्विंटल1400865089208850
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल6860088018801
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल681880089008850
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल61880088508825
उमरेडलोकलक्विंटल107860087108650
देउळगाव राजालोकलक्विंटल300880089658850
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल101880089508900
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल36450085908550
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल940860089658790
02/12/2022
सावनेरक्विंटल2700860087008655
किनवटक्विंटल123840088008650
राळेगावक्विंटल2000870090119000
भद्रावतीक्विंटल136872588008763
वडवणीक्विंटल6890089008900
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल16860088008800
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ – लांब स्टेपलक्विंटल451860090008900
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल1004880090508900
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल90326089008890
अकोलालोकलक्विंटल20870089008800
उमरेडलोकलक्विंटल722870090508800
मनवतलोकलक्विंटल1300870092359151
देउळगाव राजालोकलक्विंटल400895091409000
वरोरालोकलक्विंटल258860088508700
वरोरा-माढेलीलोकलक्विंटल156863188008700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल83850087008600
किल्ले धारुरलोकलक्विंटल2662890190098956
काटोललोकलक्विंटल104870088008750
कोर्पनालोकलक्विंटल730850087008600
मंगरुळपीरलांब स्टेपलक्विंटल145850087008600
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल170885090259000
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल958860090158880
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल300875090008850
खामगावमध्यम स्टेपलक्विंटल408870088508775
यावलमध्यम स्टेपलक्विंटल47764085608250
चिमुरमध्यम स्टेपलक्विंटल256890089518941
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल525870092759125

वाचा : आजचे सोयाबीन बाजार भाव; Soyabeen Rates Today 03/12/2022