कोरोना मानवनिर्मित विषाणू, वुहान प्रयोगशाळेतूनच लिक!


Last Updated on December 6, 2022 by Vaibhav

अमेरिकेने निधी पुरवल्याचा त्या लॅबमधील शास्त्रज्ञाचा दावा

न्यूयॉर्क : संपूर्ण जगाला जवळपास दोन वर्षांपर्यंत वेठीस धरणारा ‘कोरोना’ विषाणू हा मानवनिर्मित असून, तो चीनच्या वादग्रस्त वहान प्रयोगशाळेतूनच लिक झाला होता, असा खळबळजनक दावा एका अमेरिकन वैज्ञानिकाने आपल्या नवीन पुस्तकातून केला आहे. इतकेच नाही, तर युहानच्या संशोधनाला अमेरिकेकडून अर्थपुरवठा केला जात होता, असा धक्कादायक खुलासाही गा प्रयोगशाळेत काम करणाऱ्या या वैज्ञानिकाने केला आहे.

चीनच्या वुहान शहरातून सर्वप्रथम कोरोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर या महामारीने संपूर्ण जगात थैमान माजवले. त्यामुळे सुरुवातीपासूनच चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (व्हीआयव्ही) नामक प्रयोगशाळा वादाच्या भोवऱ्यात होती. याच प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्याचा दावा यापूर्वी अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. आता अमेरिकन वैज्ञानिक अँड्र्यू हफ यांनी आपल्या ‘द टूथ अबाऊट बुहान या नव्या पुस्तकातून या दाव्याला बळकटी देतानाच हा विषाणू मानवनिर्मित असल्याचा खळबळजनक खुलासादेखील केला आहे. महामारी विशेषज्ज्ञ हफ यांच्यानुसार कोरोना विषाणू हा मानवनिर्मित असून, तो चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीतूनच लिक झाला होता. हफ यांच्या पुस्तकातील काही मजकूर ब्रिटिश वृत्तपत्र ‘दन सन’मध्ये छापून आला असून, त्या आधारावर न्यूयॉर्क टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. अपुऱ्या सुरक्षा सुविधेसह वुहान प्रयोगशाळेत संशोधन सुरू होते.

या ठिकाणी जैवसुरक्षा आणि जोखीम व्यवस्थापनबाबत विशेष काळजी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे येथून कोरोना विषाणू लिक झाल्याचा हफ यांचा दावा आहे. दशकभराहून अधिक काळापासून अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्था अर्थात एनआयएचच्या निधीद्वारे वटवाघळात आढळणाऱ्या कोरोना विषाणूचा चीनमध्ये अभ्यास सुरू आहे. वुहान प्रयोगशाळेत या विषाणूद्वारे इतर प्रजातींवर हल्ला करण्यासाठी पद्धत शोधून काढण्याचे काम अनेक वर्षांपासून केले जात असल्याचे हफ यांचे म्हणणे आहे. कोरोना हा जनुकीय बदलाद्वारे तयार करण्यात आलेला विषाणू असून, या प्रयोगाच्या संभाव्य धोक्याबाबत चीनला पहिल्या दिवसापासून कल्पना होती, तसेच चीनला घातक जैव तंत्रज्ञान पुरवण्यासाठी अमेरिकन सरकार दोषी असल्याचा गंभीर आरोप हफ यांनी केला आहे. वुहान प्रयोगशाळेकडे संसाधनांची कमतरता असतानाही सर्वोच्च संशोधन करण्यासाठी चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा संस्थेवर प्रचंड दबाव आहे. काही संस्थांच्या अभ्यासानुसार वुहान प्रयोगशाळा ही चीनमधील कोरोना विषाणूचे संशोधनाचे सर्वांत धोकादायक केंद्र आहे.हेही वाचा: अन्वर इब्राहिम मलेशियाचे नवे पंतप्रधान