नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे देशभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत.
आता सर्व राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. अनेक राज्यांनी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला महागात पडू शकते. कोरोनाचा धोका वाढला असून २९ विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या घटनेने पालक आणि प्रशासनामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील एका निवासी शाळेत किमान 29 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 9वी आणि 10वीच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विद्यार्थिनींच्या पालकांना घरी नेण्याची सूचना करण्यात आली आहे. खोकला आणि सर्दीच्या लक्षणांमुळे संक्रमित विद्यार्थ्यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोरोनाने मृत्यू; २१६ व्यक्तींच्या वारसांच्या खात्यात १ कोटी ८ लाख जमा