शिक्षण सेवकांना ख्रिसमस गिफ्ट; मानधनात घसघशीत वाढ..!


Last Updated on December 23, 2022 by Piyush

नागपूर : राज्यातील शिक्षण सेवकांच्या मासिक मानधनात तब्बल १२ वर्षांनंतर मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक १४४ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

शिंदे – फडणवीस सरकारने ही वाढ करत शिक्षण सेवकांना भेट दिली आहे. हे मानधन लवकरच वाढविले जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अलीकडेच केली होती.

२०११ पासून होती प्रतीक्षा

थेट पगारावर शिक्षक नेमण्याऐवजी मासिक मानधनावर शिक्षण सेवक नेमण्यास राज्य सरकारने २००२ मध्ये सुरुवात केली. त्यावेळी आघाडी सरकार होते. सुरुवातीला ते पाच हजार रुपयांपर्यंत मानधन मिळत होते. २०११ मध्ये आघाडी सरकार असतानाच ते वाढविण्यात आले.

त्यांनाही फायदा

अधिक दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी दिली. ३० हजार शिक्षकांची जी भरती राज्यात होणार आहे त्यांनादेखील नवीन मानधन लागू केले जाणार आहे.

शिक्षकांचे मासिक मानधन

प्रवर्ग : आधीचे : सुधारित
प्राथमिक : ६००० : १६,०००
माध्यमिक : ८००० : १८,०००
उच्च माध्यमिक : १०,००० : २०,०००

वाचा : आयपीईएफ क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून विकासाला चालना देणार