Nashik Farmer: नाशिक जिल्ह्यात कांदा दरता मोठी घसरण


Last Updated on November 22, 2022 by Piyush

Nashik News : मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठवड्याचा पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. २१) कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक झळ सोसावी लागली. गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेत कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी २१०० रूपये क्विंटल असलेले भाव सोमवारी सरासरी ९०० रुपये क्विंटलपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. सोमवारी मनमाड बाजारपेठेत उन्हाळ कांद्याचे २७३ ट्रॅक्टर इतकी आवक झाली. प्रथम दर्जाच्या उन्हाळ कांद्याला ६०० ते १३९० सरासरी ९०० रुपये क्विंटल दर मिळाला.

गत सप्ताहात ७४, ७५८ क्विंटल कांद्याची आवक

लासलगाव : गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ७४,७५८ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान रुपये ५००, कमाल रुपये २,७२१ तर सर्वसाधारण रुपये १,७२६ प्रती क्विंटल राहिले.

लासलगाव बाजारातील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव पुढीलप्रमाणे :

गहू (५३७ क्विंटल) भाव २,४०० ते ३,१०१ सरासरी २,७४१ रुपये, बाजरी लोकल (१०७ क्विंटल) भाव २,००० ते ३,११६ सरासरी २,४६५ रुपये, ज्वारी लोकल (०२ क्विंटल) भाव १,७०१ ते १,८५१ सरासरी १,७७६ रुपये, हरभरा लोकल (५१ क्विंटल) भाव ३,६०० ते ५,०९१ सरासरी ४,१५४ रुपये, हरभरा जंबू (५३ क्विंटल) भाव ३,००० ते ४,३६१ सरासरी ४,१८१ रुपये, हरभरा काबुली (५१ क्विंटल) भाव ३,००० ते ५,७१२ सरासरी ५,१८२ रुपये, सोयाबीन (९,४२३ क्विंटल) भाव ३,००० ते ५,८७५ सरासरी ५,६६२ रुपये, मूग (७९ क्विंटल) भाव २,००० ते ८४०१ सरासरी ७,७९० रुपये, मका (३२,३१८ क्विंटल) भाव १,५०० ते २,१९९ सरासरी २,०७९ रुपये प्रती क्विंटल राहिले.

दरम्यान, कांदा दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

निफाड उपबाजारातील आवक व बाजारभाव

उन्हाळ कांदा (१७,३१० क्चिटल). भाव रुपये ४०० ते २,४००, सरासरी रुपये १,६००, सोयाबीन (७,०२५ क्विटल) १,३०१ ते ५,९४० सरासरी ५,६९० रुपये, मका (१,८७९ क्विंटल) १,६०३ ते २,१११ सरासरी १,९६१ रुपये, गहू (२५२ क्विटल) २,२०० ते २,८९९ सरासरी २,७३१ रुपये, मूग (१२ क्विटल] २,५०२ ते ७,४०० सरासरी ६,८०० रुपये, हरभरा (१५ क्विटल) ३,००० ते ४,४३५ सरासरी ४,००० रुपये प्रती क्विटल राहिले.

वाचाच : सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना 75 हजार जमीन भाड्यापोटी मिळणार