कृषी अभ्यासक्रमाला आले ‘अच्छे दिन’


Last Updated on November 22, 2022 by Vaibhav

नवीन तंत्रज्ञान, अर्थार्जनाच्या संधीमुळे कल वाढला

मुंबई : राज्यात कृषी अभ्यासक्रमाचे आतापर्यंत जवळपास ८० टक्के प्रवेश निश्चित झाले असून कृषी अभ्यासक्रम प्रवेशाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजगाराच्या संधी, नवनवीन तंत्रज्ञान आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी पसंती देत आहेत. नऊ शाखांपैकी बीएस्सी. अॅग्रो, बीएस्सी. फॉरेस्ट्री, बीएस्सी. हॉर्टिकल्चर आणि बीएफएस्सी आणि बीएस्सी अॅग्रो बिझनेस मॅनेजमेंट येथे प्रवेश घेण्याकडे अधिक कल आहे.

कृषी अभ्यासक्रमाच्या आतापर्यंत एकूण ३ फेऱ्या आणि केंद्रीभूत प्रवेश फेरी झाली आहे. दरम्यान, संस्था स्तरावरील प्रवेशफेरी अद्यापही सुरू आहे. या फेऱ्यांमध्ये आतापर्यंत ११ हजार ४२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यामध्ये फिशरी सायन्स आणि बीएस्सी फॉरेस्ट्री अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता कमी असूनही त्या जागा १०० टक्के भरल्या आहेत.सातत्याने होणारे बदल, आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता यामुळेच या शाखांकडे कल अधिक असल्याची माहिती सीईटी सेलच्या कृषी विभागाचे समन्वयक डॉ. मंगेश निकम यांनी दिली…

गणितामुळे बी.टेक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ

बारावीला अभ्यासक्रमासाठी पीसीबी गट घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे वळण्याचा कल अधिक असतो, तर पीसीएम हा गट घेतलेले विद्यार्थी इंजिनिअरिंगकडे वळतात. त्यामुळे बी.टेक (ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग) आणि बी.टेक. (फूड टेक्नोलॉजी) या अभ्यासक्रमांना पीसीएम म्हणजेच गणित हा विषय बंधनकारक आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्याकडून फारशी पसंती मिळत नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेही वाचा: Animal feed : पशुखाद्याच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ; दूध उत्पादकांना झटका