नऊ लाखांच्या कर्जावर वसूल केले ५१ लाख !


Last Updated on January 4, 2023 by Vaibhav

नाशिक: शहर व परिसरात खासगी सावकारीचे जाळे दिवसेंदिवस – अधिकाधिक विस्तारत आहे. एका – खासगी सावकाराने ५ टक्के व्याजाच्या बोलीवर नऊ लाखांचे कर्ज देऊन ■ कर्जदार फिर्यादीकडून सुमारे ५० लाख ९० हजार रुपये घेतले. तसेच अजून वीस लाख रुपये द्यावे, यासाठी फिर्यादीचा मानसिक छळ सुरू केल्याने अखेर त्याने मुंबई नाका पोलिसांकडे धाव घेत लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित सावकाराविरुद्ध सावकारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी सुरेश पुजारी (५४, रा. राणेनगर) यांनी संशयित विजय शंकरराव देशमुख (रा. कर्मयोगीनगर) यांच्याकडून ५ टक्के व्याजाच्या बोलीवर २००७ सालापासून २०२२ पर्यंत व्याजापोटी रोखीने ४४ लाख ९० हजार रुपये घेतले. तसेच उर्वरित ६ लाख रुपये आरटीजीएसद्वारे देशमुख यांच्या खात्यात फिर्यादी पुजारी यांनी वर्ग केले. सुमारे एकूण ५० लाख ९० हजार रुपये घेतल्यानंतरसुद्धा संशयित देशमुख यांनी त्यांना वारंवार फोनवरून धमकावत वीस लाख रुपये देण्यासाठी तगादा लावला. तसेच त्यांना व त्यांच्या मलीलादेखील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक चंद्रकांत अहिरे हे करीत आहेत.

बेकायदेशीर सावकारीचे आव्हान

■ बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय हा चांगलाच फोफावत चालला आहे. कधी दामदुप्पट व्याजदराने पैसे उकळून छळ तर कधी कमी व्याजदराचे आमिष दाखवून वारंवार पैसे उकळून शारीरिक, मानसिक छळ केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

■ काही दिवसांपूर्वी अशाच खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जापोटी व त्यांच्या छळाला कंटाळून नवविवाहित दाम्पत्याने एकाचवेळी सोबत आत्महत्या केल्याची घटना पाथर्डीजवळ उघडकीस आली होती. यामुळे पोलिसांपुढे अशा खासगी सावकारी करणायांवर अंकुश लावण्याचे आव्हान उभे राहिले आहे,

हेही वाचा: नऊ लाखांचे कर्ज, ५० लाखांची फेड; तरीही जाच कायम !