Nissan Car भारतात घालणार धुमाकूळ, 11 हजार रुपयांमध्ये घेता येणार दमदार कार

Nissan Car : निसान इंडियाने भारतीय बाजारपेठेत आपल्या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटची स्पेशल एडिशन कार लॉन्च केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, निसानचे गिझा व्हेरियंट जपानी थिएटर आणि आणि तेथील एक्सप्रेसिव्ह म्युझिकल थीमपासून प्रेरित आहे. या नवीन स्पेशल एडिशनमध्ये काय काय फीचर्स आहेत ते पाहुयात.

Nissan Car Magnite Geza Edition चे फीचर्स

निसान मॅग्नाइटची नवीन गिझा एडिशनमध्ये काही अतिरिक्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो, जेबीएल स्पीकर, ॲप-आधारित कंट्रोल, मागील कॅमेरा, बेज अपहोल्स्ट्री (पर्यायी), शार्क-फिन अँटेना आणि 9.0-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देखील मिळतो. यात टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचाही समावेश आहे.

ही नवीन कार 5 रंगांमध्ये बाजारात उपलब्ध होणार आहे. या कारमध्ये 1.0 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 71 bhp पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करते. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. मॅग्नाइटचे हायर व्हेरिएंटमध्ये 5-स्पीड MT आणि CVT गिअरबॉक्ससह 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते.

कंपनीने Nissan Magnite Giza Edition भारतीय बाजारपेठेत 7.39 लाख रुपयांच्या किमतीत लॉन्च केले आहे. कंपनीने या नवीन कारचे बुकिंगही सुरू केले आहे. ज्यांना ही कार घ्यायची आहे ते 11,000 रुपये भरून ती बुक करू शकतात. मॅग्नाइटच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत 5.99 लाख ते 11.02 लाख रुपये एक्स-शोरूम दरम्यान आहे.

Leave a Comment