सोयाबीनपेक्षा मका करतोय शेतकऱ्यांना मालामाल; आणखी दर वाढ होण्याचा अंदाज


Last Updated on December 28, 2022 by Piyush

नाशिक: परदेशात असलेली मागणी (demand abroad), पोल्ट्री इंडस्ट्रीकडूनही (Poultry Industry) होत असलेली खरेदी आणि काही प्रमाणात कमी झालेली आवक यामुळे सध्या मकाचे पीक (Maize crop) शेतकऱ्यांना मालामाल करत असून, जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान आणखी ५०-१०० रुपयांनी दर वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. १५ फेब्रुवारीनंतर मात्र दर उन्हाळ मकाची आवक सुरू होण्याचा अंदाज असून, त्यावेळी दरांवर परिणाम होण्याचा अंदाज आहे.

किमान आधारभूत किमतीपेक्षाही खुल्या बाजारात मकाला चांगला दर मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्रांकडे पाठ फिरविली आहे. सोयाबीनपेक्षा मका परवडल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून मकाला अधिक पसंती दिली जाते. यामुळे जिल्ह्यात मकाचे क्षेत्र मोठे आहे.

खरिपात जवळपास २३६९२९.९० हेक्टरवर मकाचा पेरा झाला होता. यावर्षी वेळोवेळी पडलेल्या पावसामुळे मकाच्या पिकाला पोषक वातावरण तयार झाले. केंद्र शासनाने मकाला १९६२ रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित केला आहे. परदेशात असलेल्या मागणीमुळे सध्या बहुतांश व्यापाऱ्यांकडून मकाचीं निर्यात केली जात आहे. तिकडे दरही चांगले मिळत असल्याने मकाचे दर आताच जास्तीत जास्त २१६० रुपये, तर सरासरी दर २०१० रुपयांपर्यंत आहेत.

वाचा : 👉 सोयाबीन भाव कधी वाढतील? पहा इथे क्लीक करून 👈

सोयाबीनपेक्षा मका भारी

गतवर्षी सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनचीही पेरणी केली होती. पण नवीन सोयाबीन बाजारात येताच भाव कमी झाले असल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. याउलट मकाला चांगला दर मिळत असून, उत्पादनही चांगले आले आहे.

सध्या बहुतेक मकाची निर्यात होत आहे. परदेशात मागणी चांगली असल्यामुळे मकाचे दर वाढलेले दिसतात. जानेवारी महिन्यात अजून ५०- १०० रुपयांनी दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकयांनी टप्प्याटप्प्याने मका विक्रीचे नियोजन करावे. – सागर थोरात, मका व्यापारी

यंदा पाऊस वेळेवर पडल्याने मकासाठी पोषक वातावरण तयार झाले. शिवाय उत्पादनही चांगले आले आहे. विशेष म्हणजे भाव टिकून राहिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे येत आहेत. – -अशोक दौंडे, शेतकरी.

वाचा : 👉 सोयाबीन भाव कधी वाढतील? पहा इथे क्लीक करून 👈

उन्हाळ मका भरपूर

सध्या बाजार समित्यांमध्ये खरिपातील मकाची आवक सुरू आहे. यावर्षी उन्हाळ मकाचीही लागवड चांगली आहे. गुजरात, खान्देश भागात त्याचे प्रमाण अधिक असून, फेब्रुवारीनंतर या मकाची आवक सुरू होईल. त्यावेळी खरिपाच्या मकाला स्पर्धा करावी लागणार आहे. मकाचे नियोजन करण्याचा सल्ला दिला जात आहे.

शासकीय दरापेक्षाही खुल्या बाजारात शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळत आहेत. शिवाय आर्द्रतेचे प्रमाण अधिक असले तरी व्यापारी वर्गाकडून दराबाबत फारशी घासाघीस केली जात नसल्याने शासकीय खरेदी केंद्रांकडे दुर्लक्ष करीत शेतकरी खुल्या बाजारात मका विक्रीस पसंती देत आहेत.

वाचा : 👉 सोयाबीन भाव कधी वाढतील? पहा इथे क्लीक करून 👈