तुम्ही दिल्ली घ्या आणि आम्ही गुजरात घेतो…


Last Updated on December 9, 2022 by Vaibhav

मुंबई: आम आदमी पक्ष (आप) आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती, तर गुजरातमध्येही काँटे की टक्कर पाहायला मिळाली असती, पण तसे झाले नाही. कदाचित तुम्ही दिल्ली घ्या आणि आम्ही गुजरात घेतो, असे काहीतरी डिल भाजप आणि ‘आप’मध्ये झाले असावे, अशी शंका शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. याचवेळी राऊत यांनी हिमालच प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राऊत यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बुधवारी दिल्लीत आपने भाजपची १५ वर्षांची सत्ता खेचून आगली. याठिकाणी मतविभागणी झाली नसती, तर ‘आप’ला आणखी यश मिळाले असते. पण ‘आप’ची कामगिरी कौतुकास्पद आहे. १५ वर्षांची सत्ता खाली खेचणे सोपे नाही, तर गुजरातचा निकाल अपेक्षित आहे. तिकडे आप आणि अन्य पक्षांनी आघाडी केली असती, तर गुजरातमध्येही काँटे की टक्कर पाहायला मिळाली असतो. पण कदाचित तुम्ही दिल्ली घ्या आणि आम्ही गुजरात घेतो, असे काहीतरी डिल भाजप आणि ‘आप’मध्ये झाले असावे, अशीशंका आहे.

हिमाचल प्रदेशात काँग्रेस पक्षाने चांगली टक्कर दिली, हे चित्र आशादायक आहे. देशातील तीन प्रमुख निवडणुकांमध्ये गुजरात भाजपला मिळाले, दिल्ली आपला मिळाली आणि हिमाचल प्रदेश काँग्रेसला मिळाले. गुजरातमधील यशासाठी मी भाजपचे अभिनंदन करतो. देशातील पुढील निवडणुकां दृष्टीने हे चित्र आशादायक आहे. फक्त विरोधकांनी एकत्र येण्याची गरन आहे. हेवेदावे दूर ठेवून एकत्र लढले, तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन होईल, असा दावाही राऊत यांनी केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा गुजरातच्या निवडणुकांशी संबंध जोडण्याची गरज नाही. राहुल सध्या देशाच्या आणि काँग्रेसच्या राजकारणापासून दूर आहेत, ते एका वेगळ्या मिशनवर आहेत, असेही राऊत पुढे म्हणाले.हेही वाचा: भाजप पुन्हा एकदा ‘मोदी है तो मुमकीन है’चा नाद