Last Updated on December 5, 2022 by Vaibhav
जेवनाळा (भंडारा) : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आलेले जंगली हत्ती चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रवासात असलेले हत्ती हे चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या हत्तींच्या मार्गात आलेल्या ठिकाणाची नासधूस झालेली आहे. पेंढरी येथे त्यांनी शेतात लावलेल्या केळींवर ताव मारल्याचे दिसत आहे. आपल्या जिल्ह्यात या पूर्वी कधीही न दिसणारा हत्ती हा मुक्त वावरताना दिसत असल्याने याबद्दल जिल्हावासीयांच्या मनात या प्राण्याबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. मात्र, या प्राण्यांमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते चिंतेच्या छायेत आहेत. १ डिसेंबरला सानगडी परिसरातून दाखल झालेले जंगली हत्ती मोहघाटा जंगलातून लाखनी तालुक्यातील रेंगेपर कोहळी येथे आले..
येथून १ तारखेच्या रात्री पेंढरी गावात आले. या दरम्यान या हत्तींनी येथील शेतकरी घनश्याम राऊत यांच्या शेतावरील बागेतील केळी फस्त करत झाडांचे नुकसान केले आहे. त्याचप्रमाणे शेतावर मळणी करून ठेवलेले धानाचे पोते फाडून नासधूस केली आहे.शेत शिवारात या हत्तींचे पायाचे ठसे नागरिकांना घाबरवणारे आहेत.हेही वाचा: ‘आई 5 डिसेंबरला मरणार आहे… सुट्टी हवी! शिक्षकाचा शाळेत सुट्टीसाठी अर्ज