शिलाई मशीन चा शोध कोणी लावला?


Last Updated on November 21, 2022 by Vaibhav

ब्रिटीश संशोधक थॉमस सेंट यांनी १७९० मध्ये चामड्याला छिद्र पाडून त्यातून एक धागा वारंवार घालून शिवता येईल अशी मशीन बनवली. त्यानंतर १८३० मध्ये फ्रेंचमार बार्थेलेमी थिमोनियर यांनी यशस्वीरित्या एक मशीन तयार केली, ज्यामध्ये ही ‘चेन स्टीच’ पद्धतदेखील वापरली गेली. १२ वर्षांत त्याने ८० मशीन तयार केल्या, परंतु संतप्त टेलर जमावाने ती नष्ट केली.

शिलाई मशीन विकसित करणारी पहिली व्यक्ती अमेरिकन संशोधक वॉल्टर हंट (१७९६ – १८५९) होते. १८३४ मध्ये धाग्याच्या दोन रीळ (वरच्या स्पिडलवर आणि खालच्या बॉबिनवर) एक सुई वापरून ‘लॉकस्टिच’ म्हणजेच दोन थ्रेड लॉक जेव्हा ते एकत्रितपणे एका छिद्रातून जातात तेव्हा शिलाई बनते, असा महत्त्वाचा शोध त्यांनी लावला होता. हंट शिलाई मशीनचे पेटंट करण्यात अयशस्वी झाला. यामुळे १२ वर्षांनंतर अमेरिकेतील सहकारी एलियास हॉवे यांना लॉकस्टिच मशीनचे पेटंट घेणे सोपे झाले. हॉवेने अनेक प्रतिस्पर्थ्यांपासून आपल्या हक्कांचे रक्षण केले, विशेषतः आयझॅक सिंगर, ज्याने इंटच्या मशीनवर आधारित नवीन उपकरण पेटंट करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु हॉवेने कोर्टात केस जिंकली आणि सिंगरला पैसे देण्यासाठी भाग पाडले. पण त्यानंतर सिंगरने मोठ्या प्रमाणावर शिलाई मशीनचे उत्पादन केले आणि त्याचे नाव आजपर्यंत शिवणकामाच्या मशीनशी जोडले आहे. हेही वाचा: Vaseline: तुम्हला माहित आहे का थंडीत वापरले जाणार व्यासलीन (Vaseline) कशे तयार झाले