वर्तमानपत्राचा शोध कोणी लावला


Last Updated on November 21, 2022 by Vaibhav

जगातील पहिले वर्तमानपत्र १६०५ साली फ्रान्समधील स्ट्रास्बॉग येथे जोहान्न कॅरोलस (१५७५ – १६३४) यांनी सुरू केलं. ‘रिलेशन अ‍ॅलेर फरनेमेम उंड जेदेनकवर्दिगेन हिस्टोरीन’ असे वर्तमानपत्राचे नाव आहे, पण त्या अगोदर लोकांसमोर एखादी गोष्ट ठेवणं ही वर्तमानपत्राची संकल्पना दीड हजार वर्षे जुनी होती. ज्युलिय सीझरने ‘अ‍ॅक्टा दिउर्ना’ नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, जे दगड किंवा धातूवर असायचं. त्याद्वारे नागरिकांना सूचना मिळायची. त्यानंतर ८०० वर्षांनी ७१३ साली चीनच्या तांग घराण्याने ‘कायोन झा बोव’ नावाचं रेशमी कापडावर लिहिलेलं वर्तमानपत्र न्यूज बुलेटीन सुरू केलं.

सुरुवातीला कॅरोलस हाताने बातम्या कागदावर लिहून त्या लोकांना विकायचा. नंतर मात्र त्याने वर्तमानपत्र स्वस्त व्हावं म्हणून १६०४ मध्ये प्रिंटिंग प्रेस विकत घेतले, पण हे वर्तमानपत्र फार चाललं नाही. त्यानंतर आलेला ‘हारलेम्स डॅगब्लड’ या नावाचं डच वर्तमानपत्र १६५६ साली सुरू झालं. ते सर्वाधिक काळ चालू असलेले वर्तमानपत्र ठरलं. सुरुवातीला या संकल्पनेकडे संशयाने पाहिलं गेलं. अमेरिकेत जेव्हा बेंजामिन हॅरिसने १६९० साली वर्तमानपत्र सुरू केलं, तेव्हा पहिल्या अंकानंतरच सरकारने त्याच्यावर धाड घातली आणि एका अंकातच ते बंद पडलं. आज वर्तमानपत्र फक्त कागदावर न वाचता मोबाईलवरदेखील वाचता येतं. हेही वाचा: बायकोला बुलेटवर बसवून खतरनाक स्टंट, व्हिडिओ व्हायरल