नगर : आधी पावसाने त्यानंतर सततचे ढगाळ आणि धुके या वातावरणामुळे कांदा पिकाचे (Onion crop) आतोनात नुकसान झाले होते. एकरी 58 हजार रूपये खर्च शेतक-यांना आला होता. मात्र, झालेला खर्चही हाती आला नाही. यंदा पीकही गेले नि खर्चही पाण्यात गेला, अशी कांदा उत्पादक शेतक-यांची व्यथा झाली आहे.
पारनेर तालुक्यात कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड असते. पठार भागातील कान्हूर पठार, विरोली, वेसदरे, पिंपळगाव तुर्क, पिंपरी पठार, पुणेवाडी यांसह अन्य गावांमध्ये वाटाणा पिकानंतर कांद्याची लागवड करण्यात आली होती. वाटाणा पिकांचेही पावसामुळे आतोनात नुकसान झाले. त्यानंतर करण्यातं आलेल्या कांद्याच्या पिकांमध्ये तरी काहीतरी हाती लागेल आसे शेतक यांना वाटले होते. मात्र केलेला खर्चही हाती न आल्याने शेतकरी संकटात सापडला.
पठार भागाचे अर्थकारण या पिकांवर अवलंबून असते. शेतीसाठी व इतर कामांसाठी काढण्यात आलेले पतपेढींचे कर्ज या पिकांच्या उत्पादनातून मिळालेल्या रकमेतून भरले जाते. उर्वरित रकमेची ठेवदेखील शेतकरी वर्ग ठेवत असतो. मात्र, हाती काहीच न आल्याने पतसंस्थेचे अर्थकारणदेखील हळूवार सुरू आहे. खराब वातावरणामुळे उत्पादन कमी झालेच मात्र निघालेला मालही काही प्रमाणात खराब निघत असल्याने बाजारात मालाला भाव मिळत नाही. चांगल्या कांद्याला पंचवीस ते तीस व त्या खालील मालाला दहा ते पंधरा रूपये भाव मिळाला आहे.
कांदा लागवडीस एकरी ५८ हजार रूपये खर्च करण्यात आला. सात एकर कांद्याला ४ लाख रूपये खर्च आला तीन एकर क्षेत्रात खर्च वजा ९५ हजार रूपये मिळाले. अवकाळी पाऊस नंतर धुक्याचे वातावरण, वाढती मजुरी यामुळे कांदाउत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. मिनीनाथ देठे, कांदा उत्पादक शेतकरी, कान्हूर पठार.
Kanda Bajar Bhav: कांद्याचे भाव गडगडले! 8-10 रुपये किलोने विक्री