जिनपिंग-ट्रूडो यांच्यात शाब्दिक चकमक


Last Updated on November 18, 2022 by Vaibhav

बाली : इंडोनेशियाच्या राजधानीत पार पडलेल्या जी-२० शिखर परिषदेच्या समारोपानंतर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टूडो यांच्यात प्रसारमाध्यमांसमोरच शाब्दिक चकमक उडाल्याचे बघायला मिळाले. बैठकीनंतर टूडो यांच्याशी दुभाषीद्वारे संवाद साधताना जिनपिंग यांनी आपल्या बैठकांमधील चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये लिक होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

द्विपक्षीय चर्चेची ही पद्धत नाही. तुम्ही गंभीर असला तरच आपल्यात चांगली चर्चा होऊ शकते; अन्यथा अडचणीचे ठरेल, असे जिनपिंग म्हणाले. दुभाषी जिनपिंग यांच्या वाक्यांचे भाषांतर करत असतानाच टूडो यांनी त्याला थांबवत आपली बाजू मांडली.

स्वतंत्र, मुक्त आणि स्पष्ट संवाद करण्यात आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही तसेच वागणार. आम्ही तुमच्यासोबत काम करत राहू परंतु यादरम्यान काही मुद्द्यांवर आपले एकमत होऊ शकत नाही, असे टूडो म्हणाले. यावर चिनी राष्ट्रपतींनी चर्चेसाठी सकारात्मक वातावरणनिर्मितीची गरज व्यक्त केली. यानंतर दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले आणि तेथून निघून गेले. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांनी कॅमेऱ्यात टिपला. चिनी परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना सामान्य असल्याची प्रतिक्रिया दिली. उभय नेत्यांमध्ये सामान्य संवाद झाला असून, वादविवाद झाल्याचे म्हणता येणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले. हेही वाचा: One Bitcoin A Day: कर्जबाजारी असलेला हा देश खरेदी करेल दररोज एक बिटकॉइन, राष्ट्रपतींनी ट्विट करून दिली माहिती