मुंबई : राज्यात वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवरील कारवाईसाठी वाहतूक विभागाने वाहन मालकांवर जबाबदारी निश्चित केली आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर चालकाची ओळख पटवून देण्याची जबाबदारी संबंधित वाहन मालकाची असेल.
महत्त्वाची बाब म्हणजे धोकादायक प्रकारे वाहन चालवणाऱ्या चालकांना सिग्नल जंपिंगसारख्या पहिल्याच चुकीसाठी थेट न्यायालयात जावे लागणार आहे. तसेच रस्ते • सुरक्षा मानकांचा भंग करणाऱ्या चालकांना विनाहेल्मेटसारख्या पहिल्या चुकीसाठी थेट तीन महिन्यांच्या लायसन्स निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
याबाबत वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, १ डिसेंबरपासून राज्य शासनाने नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये वाहतूक दंडात वाढ करताना काही नियम अधिक कठोर केले आहेत. रस्ते सुरक्षा नियमांचा भंग करणाऱ्या चालकांचे परवाने पहिल्याच चुकीसाठी तीन महिन्यांकरिता निलंबित केले जाणार आहे. यामध्ये विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, ओव्हलोडींग यांसारख्या नियमांचा समावेश आहे. सिग्नल जंपिंग, नो एंट्रीत भंग करणे यांसाठी त्यांचे लायसन्स न्यायालयात पाठवण्याची तरतूद केली आहे.
वाहन मालकाने कोणत्यातरी चालकास वाहन चालवण्यास दिलेले असते अशावेळी दंडाचा मेसेज हा मालकाच्या मोबाईलवर जातो. मात्र वाहनाची जबाबदारी मालकाची असल्याने संबंधित चालकाची माहिती वाहतूक प्रशासनास देण्याची जबाबदारीही मालकावर ठेवण्यात आली आहे.
नियम मोडला तर दोन वर्षे कैद व १० हजार रुपये दंड
धोकादायक प्रकारे वाहन चालवण्याच्या प्रकारात ५०हून अधिक नियमांचा समावेश वाहतूक प्रशासनाने केला आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास चालकावर पहिल्याच चुकीसाठी १८४ कलमाअंतर्गत थेट न्यायालय कारवाई करणार आहे. या कलमामध्ये किमान ६ महिने व कमाल १ वर्षाची कैद सुनावली जाऊ शकते किंवा चालकाकडून एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची आकारणी केली जाऊ शकते. दुसऱ्यांदा याच नियमांचे उल्लंघन केल्यास चालकास दोन वर्षांपर्यंत शिक्षा किंवा १० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे.
तर परवाना निलंबन
- विनाहेल्मेट दुचाकी चालवणे दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे
- वाहनातून क्षमतेहून अधिक मालाची वाहतूक
- घाटात गिअर न्युट्रल करून वाहन चालवले तर न्यायालयात खटला
- रेड सिग्रल जंपिंग
- स्टॉप साईनचे उल्लंघन
- वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे
- नो पार्किंग, बोगद्यात, वाहन उभे करणे
- डाव्या बाजूने ओव्हरटेकिंग
- लेन कटींग
- रॅश ड्रायव्हिंग डबल पार्किंग