आगामी सिडको लॉटरी 2023: आवश्यक पात्रता अटी व शर्ती । Cidco Lottery Eligibility

Cidco Lottery Eligibility : सिलेक्ट माय सिडकोम होम ही योजना १५ ऑगस्ट च्या मुहूर्तावरती जाहीर केली जाणार होती, मात्र काही कारणास्तव ही योजना आता गणेश चथूर्थीच्या मुहूर्तावर जाहीर केली जाऊ शकते असं सांगण्यात येत आहे. या योजनेतील महत्त्वाच्या बाबी आपण इथे पाहणार आहोत. जेणेकरून आपण लॉटरीआधीच संपूर्ण कागदपत्रे तयार करून ठेऊ शकतात. चला तर मग पुढे आपण संपूर्ण अटी व शर्ती सविस्तर जाणून घेऊया..!

या योजनेसाठी अर्ज सादर केल्याच्या तारखेला अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्जदारांकडे त्यांच्या नावाचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न परिगणित करताना त्याला मिळणाऱ्या पगारातील मूळ पगार आणि महागाई भत्ता यातून येणारे उत्पन्न ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय मिळणारे इतर भत्ते वार्षिक कौटुंबिक उत्पन्न म्हणून ग्राह्य धरले जाणार नाहीत.

उत्पन्नावर आधारित पात्रता

अ) प्रधानमंत्री आवास योजना (EWS) श्रेणी (PMAY)
अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रुपये ६ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

‘कौटुंबिक वार्षिक उत्पन्न’म्हणजे अर्जदाराचे आणि त्याच्या/तिच्या जोडीदाराचे वार्षिक उत्पन्न एकत्रित केल्यास, (नोकरी किंवा व्यवसायातून समाविष्ट असलेल्या) सलग १२ महिन्यांचे (उदाहरणार्थ – १/४/२०२२ ते .३१/०३/२०२३) आर्थिक वर्षातील उत्पन्न हे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न म्हणून ग्राह्य धरले जाईल. यासाठी अर्जदाराने तो नोकरी करत असलेल्या संस्थेने दिलेले वेतन प्रमाणपत्र किंवा तहसीलदाराने दिलेला दाखला किंवा आयकर विभागाने दिलेले विवरणपत्र (आय टी रिटर्न) उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे.

ब) सर्वसमावेशक (खुला उत्पन्न गट/ Non PMAY) श्रेणी

या श्रेणीतील अर्जदारांसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही. तथापि, अर्जदाराने आर्थिक वर्षातील (उदाहरणार्थ- १/४/२०२२ ते ३१/०३/२०२३) १२ महिन्यांच्या उत्पन्नाचा तपशील सादर केला पाहिजे. नोकरी करत असलेल्या संस्थेने दिलेले वेतन प्रमाणपत्र किंवा तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विभागाने दिलेले विवरणपत्र (आय टी रिटर्न) उत्पन्नाचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे.

२.पक्के घर नसल्याचे प्रतिज्ञापत्र

अ) प्रधानमंत्री आवास योजना (EWS) श्रेणी
या श्रेणीतील अर्जदार किंवा अर्जदाराच्या जोडीदाराच्या मालकीचे भारतात कोठेही पक्के घर नसावे.

ब) सर्वसमावेशक (खुला उत्पन्न गट/Non PMAY) श्रेणी
या श्रेणीतील अर्जदार किंवा अर्जदाराच्या जोडीदाराच्या मालकीचे नवी मुंबईत कोठेही पक्के घर नसावे.

३. अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट) (फक्त प्रधानमंत्री आवास योजनेतील अर्जदारांसाठी)

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज करणारा अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागात कमीत कमी १५ वर्षाचे वास्तव्य केलेला असावा. त्यासाठी त्याला अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल सर्टिफिकेट) सादर करणे आवश्यक आहे. जर हे अधिवास बार कोड नसलेले असेल, तर त्याचे बार कोडसह नूतनीकरण करुन सादर करणे आवश्यक आहे. (माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि निमलष्करी दलातील अर्जदारांना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची अट नाही.)

४. आरक्षित प्रवर्ग (दोन्ही श्रेणीसाठी)

प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) आणि सर्वसमावेशक (खुला उत्पन्न गट) (Non PMAY) या दोन्ही श्रेणीसाठी लागू असेल. हे आरक्षण दोन प्रकारचे आहे.

अ. सामाजिक आरक्षित प्रवर्ग (वैधानिक)

आरक्षित प्रवर्गाचे नावआरक्षणाची टक्केवारी
अनुसूचित जाती व नवबौध्द (SC) ११%
अनुसूचित जमाती (ST)६%
भटक्या जमाती (NT)१.५%
विमुक्त जमाती (DT)१.५%

या श्रेणीत अर्ज करणाऱ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर सादर करणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्या अर्जदाराला वाटपपत्र (Allotment Letter) दिले जाईल.

ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही किंवा खूप आधी काढलेले आहे, त्यांनी संबंधित विभागाकडे नमुना १५ अ सादर करुन बार कोडसह असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राची मागणी करावी. तशी मागणी करण्यासाठी संबंधित अर्जदाराला सिडकोचे शिफारस प्रमाणपत्र आवश्यक असते. ते मिळण्यासाठी त्याला सिडकोकडे अर्ज करावा लागेल.

ब. विशेष आरक्षित प्रवर्ग (गैर वैधानिक) (लागू असल्यास)
सिडको महागृहनिर्माण योजनेत पुढीलप्रमाणे विशेष आरक्षण गैर वैधानिक असेल.

  • धार्मिक अल्पसंख्याक
  • महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त (PAP)
  • दिव्यांग (शारीरिकदृष्ट्या अपंग- किमान ४०% अपंगत्व असलेले)
  • मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील नोंदणीकृत माथाडी कामगार
  • सेवेत असलेले राज्य सरकारी कर्मचारी, महाराष्ट्र सरकारची विविध महामंडळे / स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी (कमीत कमी पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचा-यांसाठी)

महाराष्ट्रातील पत्रकार

सेवेत असलेले सिडको कर्मचारी (कमीत कमी पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी) सिडको कर्मचारी फक्त सर्वसमावेशक श्रेणीत (Non PMAY) अर्ज करु शकतात.

माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि निमलष्करी दलाचे कर्मचारी (या प्रवर्गात लष्कर (भूदल), वायुसेना, नौसेना कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, राष्ट्रीय सुरक्षा दल, सशस्त्र सुरक्षा दल, इंडो तिबेटियन सीमा पोलीस, आसाम रायफल्सचे कर्मचारी अर्ज करु शकतात.)

वाचा : MHADA Lottery Nagpur: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, नागपूरमधील घरांसाठी दिवाळीत सोडत

Leave a Comment