दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक, ४ जण ठार


Last Updated on January 3, 2023 by Vaibhav

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाच्या सागरी किनाऱ्यावर दोन हेलिकॉप्टरची हवेत समोरासमोर धडकून सोमवारी झालेल्या अपघातात ४ ठार, तर तिघे जखमी झाले. मृतांमध्ये एकाच हेलिकॉप्टरमधील प्रवाशांचा समावेश आहे. अपघातानंतर दुसरे हेलिकॉप्टर गोल्ड कोस्टच्या प्रमुख बिचवर सुरक्षित उतरवण्यात यश आल्याने यातील प्रवासी बालंबाल बचावले आहेत. क्वीन्सलँड राज्यातील ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडे ४५ मैल अंतरावरील सागरी किनाऱ्यावर ही दुर्घटना घडली.

गोल्ड कास्टच्या उत्तरेकडील प्रमुख बिचवरील सीवर्ल्ड पार्कजवळ हा अपघात झाला. यावेळी बिचवरून उड्डाण करणारे एक हेलिकॉप्टर खाली उतरणाऱ्या दुसऱ्या हेलिकॉप्टरला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर एक हेलिकॉप्टर सुरक्षित खाली उतरले; मात्र दुसरे हेलिकॉप्टर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने चौघे ठार, तर तिघे जखमी झाले. या दरम्यान अपघातस्थळाकडे जाणारा ‘सीवर्ल्ड ड्राईव्ह’ मार्ग बंद केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा: रशियाने युक्रेनवर १२० क्षेपणास्त्रे डागली