Tur Price: नवी तूर बाजारात दाखल होण्यापूर्वीच दरात मोठी घट !


Last Updated on November 20, 2022 by Piyush

वाशिम: यंदाच्या हंगामातील तुरीचे पीक (Tur Crop) फुलाशेंगावर आले असताना बाजारात तुरीचे दर(tur price) प्रतीक्विंटल ७ हजार ७०० रुपयांवरून शुक्रवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांत सरासरी ७ हजार रुपये प्रतीक्विंटलपर्यंत घटले आहेत. हंगामाच्या तोंडावर तुरीच्या दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बाजार समित्यांत गत आणि आठवड्यापर्यंत तूर सोयाबीनच्या दरातही तेजी दिसत होती. दरात वाढ झाल्याने बाजार समित्यांत सोयाबीनची आवकही वाढू लागली होती. दर घसरताच सोयाबीनची आवक कमी झाली… दुसरीकडे तुरीची आवक बाजारात आधीच कमी असतानाही दरात घसरण होत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गत आठवड्यापर्यंत तुरीचे दर ७ हजार ७०० रुपये प्रती क्विंटलच्यावर होते. शुक्रवारी मात्र दरात घसरण होऊन तुरीला अधिकाधिक ७ हजार २५० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळाले. आधी सोयाबीनच्या दरात घसरण होत असताना तुरीचेही दर घसरू लागले. नवी तूर येत्या महिना, दीड महिन्यात बाजारात दाखल होण्यापूर्वीच दर घसरू लागल्याने शेतकरी वर्ग पुन्हा निराश होऊ लागला आहे.

आवक अगदीच कमी

गेल्या काही दिवसांत बाजारात तुरीची अगदी नगण्य आवक होत आहे. वाशिम बाजार समितीत शुक्रवारी ५२८ क्विंटल, कारंजा बाजार समितीत ३५० क्विटल, मंगरुळपीर बाजार समितीत १८० क्विटल, मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत १५० क्विंटल एवढीच तुरीची आवक झाली होती.

का घटले तुरीचे दर?

अलिकडे भाजीपाल्याचे दर घसरल्याने डाळीचा वापर कमी झाला आहे. शिवाय नवी तूर महिनाभरात बाजारात दाखल होणार असल्याने मिलधारकांनी तुरीच्या खरेदीला काही प्रमाणात ब्रेक दिला आहे. त्यामुळे बाजारात तुरीचे दर घसरल्याचे व्यापारी आनंद चरखा यांनी सांगितले.

आगामी काळात तुरीचे दर वाढण्याची शक्यता

देशात तुरीची लागवड जवळपास साडेचार टक्क्यांनी घटली. अनेक भागांमध्ये लागवड योग्य पाऊस उशीरा झाला. पावसाळ्यात काही दिवस सतत पाऊस पडला. तर पावसाचा खंडही होता. त्यामुळे तूर पिकाचे नुकसान झाले. शिवाय विविध रोगांमुळेही तुरीला फटका बसला. त्यामुळे यंदा तूर उत्पादन २५ ते २७ लाख टनांच्या दरम्यान राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे बाजारात तुरीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

तूर बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/11/2022
उदगीरक्विंटल23730075027401
कारंजाक्विंटल270667073556855
अमरावतीगज्जरक्विंटल3700073507175
लातूरलालक्विंटल268600173006900
अकोलालालक्विंटल173650074957285
अमरावतीलालक्विंटल654735075717460
हिंगणघाटलालक्विंटल415680076307160
अमळनेरलालक्विंटल1450045004500
सावनेरलालक्विंटल3691169116911
औराद शहाजानीलालक्विंटल3550072016350
सिंदी(सेलू)लालक्विंटल13685072007100
उमरेडलोकलक्विंटल3525052505250
जालनापांढराक्विंटल84390070006000
माजलगावपांढराक्विंटल1550055005500
बीडपांढराक्विंटल1680068006800
गेवराईपांढराक्विंटल1400040004000
औराद शहाजानीपांढराक्विंटल3655073206935

वाचा : टोमॅटो दरात पुन्हा घसरण, एका दिवसात 80 रूपयांवरून दर घसरून नवा दर आहे…