ट्रकची दुचाकीला धडक; आई- वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू


Last Updated on December 3, 2022 by Vaibhav

दौंड तालुक्यातील पाटसजवळील घटना अपघातग्रस्त ट्रक पाटस पोलिसांच्या ताब्यात

दौंड तालुक्यातील पाटस ते भीमा पाटस कारखाना या अष्टविनायक महामार्गावर ट्रक आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील आई- वडिलांसह चार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शुक्रवारी (दि. २) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. संपूर्ण कुटुंबच या अपघातात मृत्युमुखी पडले आहे. यामुळे पाटस परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे संतोष सदाशिव साबळे (वय ४०) त्यांची पत्नी रोहिणी सावळे व मुलगा गुरु सावळे (वय ४, सर्वजण रा. पाटस, ता. दौंड) अशी आहेत. हे कुटुंब पाटस गावातील पळसे पुनर्वसनमधील रहिवासी होते.पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, संतोष साबळे हे त्यांची पत्नी रोहिणी आणि मुलगा गुरू यांच्यासोबत कुसेगाववरून पाटरकडे दुचाकीवरून येत होते. त्यांची दुचाकी पाटस कारखाना रस्त्यावरील कॅनॉल नजीक आली असता दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात संतोष व रोहिणी है जागेवरच मयत झाले. तर चार गुरू हा गंभीर जखमी होता. त्याला पाटसमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्याचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पाटस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, सहाय्यक फौजदार सागर चव्हाण, समीर भालेराव, सोमनाथ सुपेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील वाहतूक सुरळीत केली. यावेळी वव्यांची मोठी गर्दी अपघातस्थळी झाली होती. या अपघातातील ट्रक पाटस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

या मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी

पाटस ते कुसेगाव हा रस्ता अष्टविनायक मार्गामध्ये समाविष्ट झाला आहे. यामुळे मार्गावरील वाहतू वाढली आहे. सध्या कुसेगावमध्ये भानोबा देवाचे आगमन झाले आहे. यामुळे कुसेगावात देवदर्शनसाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या जास्त आहे. या रस्त्यावर मोठी अवजड वाहने वेगाने जातात. याचा दुचाकीस्वाराना त्रास होत आहे. या अवजड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अपघात टाळण्यासाठी या मार्गावर गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करत आहे. हेही वाचा: औरंगाबादच्या वाळूज भागात भीषण अपघाता! ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू