स्टील स्वस्त, विटा मात्र महाग | today steel rate per kg


Last Updated on March 18, 2023 by Piyush

today steel rate per kg : गेल्या दोन महिन्यात स्टीलचे दर काही हजारांनी कमी झाले आहेत. मात्र, त्याच तुलनेत इतर बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने स्वप्नातले घर पूर्ण करताना सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या मनाप्रमाणे घर कसे बांधता येईल? हाच प्रश्न पडला आहे.

स्वतःचे घर असावे तेही आपल्या मनाप्रमाणे बांधता यावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आयुष्यभराची कमाई घर उभे करण्यात अनेक जण खर्ची करतात. नोकरीतील पैसा, जमा केलेली पूंजी, यासह कर्ज काढून स्वतंत्र घर, फ्लॅट, बंगलो, रो हाऊस खरेदी केले जातात. मात्र, मागील काही वर्षांमध्ये बांधकामाच्या साहित्याचे दर गगनाला भिडल्याने घर बांधावे कसे आणि त्यासाठी एवढे पैसे आणावे कोठून ? असाच प्रश्न अनेकांना पडला आहे.

वाळूचे भाव १८ ते २० हजार

वाळूची उपलब्धता अजूनही म्हणावी तेवढी झालेली नाही. अनेक वाळू घाटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे चोरट्या पद्धतीने किंवा अल्प प्रमाणात वाळू उपलब्ध आहे. या वाळूचे दर १८ हजार ते २० हजारला तीन ब्रास एवढी झाली आहे. त्यामुळे वाळूचे भाव गगनाला भिडले आहेत.

स्टील तीन हजारांनी स्वस्त (today steel rate per kg)

स्टीलचे दर सध्या कमी झाले आहेत. यामध्ये बारा एमएम, दहा एमएम, आठ एमएम, सहा एमएम, १६ एमएम स्टीलचे दर कमी झाले आहेत. यात बारा एमएम सहा हजार तीनशे, दहा एमएम सहा हजार चारशे आठ एमएम सहा हजार पाचशे, सहा एमएम सहा हजार सहाशे, सोळा एमएम सहा हजार नऊशे एवढे झाले आहेत.

सिमेंटचे दर काहीसे वाढले

सिमेंटच्या एका पोत्याची किंमत . सध्या ३४० ते ३५० रुपये एवढी झाली आहे. हे दर मागील काही महिन्यांपासून स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मातीच्या विटा महाग, सिमेंटच्या ‘जैसे थे’

मागील दोन महिन्यात स्टीलचे दर कमी झाले आहेत. परंतू, इतर बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

खडीही महागली

वाळू, विटा, सिमेंट या सोबतच बांधकामांमध्ये गिट्टी, खडी याचा वापरही केला जातो. ही गिट्टी आठ हजार रुपये एवढ्या दराने सध्या विक्री होत आहे.

वाचा : सोन्यातील गुंतवणूक देणार छप्परफाड रिटर्न! किमतीत सातत्याने वाढ