हा दुकानदार चक्क ओल्ड मंक रमपासून बनवतो चहा


Last Updated on November 21, 2022 by Piyush

पणजी भारतामध्ये चहाचे लाखो शौकीन आहेत. त्यामुळे येथे चहाचे अनेक प्रकारही आढळून येतात. साधा चहा, फ्लेव्हर्ड चहा, मसाला चहा असे काही प्रकार फार लोकप्रिय आहेत. पण तुम्ही कधी कल्पनाही करू शकणार नाही की, रम या मद्यापासूनही चहा बनवली जाऊ शकते. हो हे खरे आहे. गोव्यामध्ये एका चहावाल्याने चहाचा हा अफलातून प्रकार शोधला आहे. त्याला त्याने ‘ओल्ड मंक टी’ असे समर्पक नाव दिले आहे.

गोवा हे राज्य म्हणजे पर्यटकांची पंढरी आहे, हे आपण जाणतो. येथील स्वच्छ, नितळ समुद्रकिनारे, मोठ, मोठी हॉटेल्स, स्थानिक मांसाहारी पदार्थ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मद्य जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. मद्यपान आणि मांसाहार याचे शौकीन असणाऱ्यांसाठी गोवा हे एक स्वर्ग वाटतो तो त्यामुळेच. मात्र, मद्याचा वापर करून चहा बनवणे म्हणजे जरा अतिच वाटते. पण एका दुकानदाराने योजलेली ही अफलातून कल्पना कमालीची मीडियावर या चहावाल्याचा ओल्ड मंक रम वापरून चहा बनवतानाचा

एका व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. चहावाला सर्वात आधी एक छोटेसे मातीचे भांडे शेगडीवर गरम करतो आणि नंतर त्या भांडात ओल्ड रम ओततो. मद्य हे ज्वलनशील असल्यामुळे तापवलेल्या भांड्यात ओतल्यावर ते पेट घेते. मग पकडीने ते भांडे शेगडीवरून उतरवून त्या तापलेल्या रममध्ये चहा पावडर, गजे साखर वगैरे टाकून तो चहा बनवतो. तर र्पण मग पुढच्या वेळी जेव्हा गोवा फिरायला जाल तेव्हा या ‘ओल्ड मंक टी’चा आस्वाद घ्यायला मुळीच विसरू नका. हेही वाचा: Himachal Pradesh: 30 हजार रुपये किमतीचा रुमाल तुम्ही कधी पाहिला आहे का, जाणून घ्या काय आहे खास या चंबा रुमालात?