न्यूयॉर्क: खगोल विज्ञानाच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीवरून काही खगोलशास्त्रज्ञांनी तान्याचा मृत्यू ‘रियल टाईम’ मध्ये पाहिला आहे. यापूर्वी अशी कोणतीही घटना ‘रियल टाईम’मध्ये पाहण्यात आली नव्हती. एका रेड सुपरजायंट स्टारचा म्हणजेच तांबड्या महाकाय
ताऱ्याचा हा मृत्यू होता. तो पाहण्याची संधी जमिनीवरील एका शक्तिशाली टेलिस्कोपमुळे मिळाली. हा तारा पृथ्वीपासून सुमारे १२० दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावरील ‘एनजीसी ५७३१’ या आकाशगंगेत आहे. या ताऱ्याचा स्फोट होण्यापूर्वी त्याचा आकार सूर्यापिक्षा दहा पटीने अधिक मोठा होता. या ताऱ्याच्या मृत्युपूर्वी काही लोक संबंधित घटनेचे साक्षीदार बनले. त्यांनी पाहिले की असे तारे नष्ट होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात त्यांच्यामधील वायूंचे अंतराळात उत्सर्जन करतात. ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’मध्ये या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
कॅलिफोर्निया संशोधक रायटर व्यान जेकब्सन-गॅलन यांनी सांगितले की एखाद्या तान्याच्या मृत्युपूर्वी मोठ्या प्रमाणात नेमके काय घडते हे यानिमित्ताने पाहिले गेले. ताज्यांमधील स्फोट होऊन त्यांचा मृत्यू होतो व या अत्यंत प्रकाशमय घटनेला ‘सुपरनोव्हा’ असे म्हटले जाते. रेड सुपरजायंट स्टारमध्ये प्री- सुपरनोव्हा घटना यानिमित्ताने प्रथमच पाहायला मिळाल्या आहेत.
…म्हणून पृथ्वीचे मानतो आभार; युसाकू मेजावा