मेष : विविध क्षेत्रांमधील स्थगित व अपूर्ण व्यवहार गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. सहकारीवर्गासह सर्व क्षेत्रांतील आवश्यक असणारे सहकार्य मिळून उत्साह वाढीस लागू शकेल.
वृषभ : कार्यक्षेत्रासह सर्व क्षेत्रांतील असणाऱ्या अडचणी निवळतील. तसेच विरोधक मंडळी सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवून वाटचाल करतील व अपेक्षित असणाऱ्या घडामोडी व घटना घडून आणणारी स्थिती आहे.
मिथुन : आर्थिक टंचाई मिटेल. विविध मार्गांवरून धनलाभाचे योग जुळून येतील. संततीबाबत असणारी एखादी चिंता मिटेल. सर्व क्षेत्रांमधील प्रगतीवार्ता हाती येऊन मानसिक आनंद वाढीस लागेल.
कर्क : धार्मिक मंगलकार्य योग जुळून येईल. तसेच पारिवारिक सदस्य मंडळींच्या विवाहबाबतचा प्रस्ताव समोर येईल. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकुल व चांगले दूरध्वनी येऊन मानसिक आनंद वाढेल.
सिंह : इतरांकडून मिळणारे मार्गदर्शन आपल्यासाठी भावी काव्यच्या दृष्टीने हितप्रद ठरेल. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या बैठका व भेटीसाठी सफलतेच्याच ठरतील व सर्व क्षेत्रांमधील दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढेल.
कन्या : आर्थिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रांमधील घडामोडी व घटना मनोनुकुल घडून येतील. महत्त्वपूर्ण कामासाठी इतरांबरोबर करावा लागणारा प्रवास कार्य साधक ठरेल व काळजीचे दडपण कमी होऊ शकेल.
तूळ : कार्यक्षेत्रात कार्यव्याप वाढेल व नियमित कामाशिवाय अतिरिक्त कार्यभार आपल्यावर सोपविला जाईल. दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी एखादी घटना घडून आणणारी ग्रहस्थिती आहे..
वृश्चिक : सर्वत्र मनावरील काळजीचे सावट निर्माण करणारी आजची ग्रहस्थिती आहे. कर्ज व्यवहार प्रकरणे या ना त्या कारणापरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावर राहतील व आर्थिक समस्या वाढतील.
धनू : विविध क्षेत्रांमधील विविध प्रकारच्या समस्या समाप्त होतील. सर्वत्र अडथळ्यांचा सामना करावा लागला तरी अपेक्षित कामे पूर्वनियोजित वेळेनुसार व्यवस्थितरीत्या पूर्ण होतील.
मकर : नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील. तसेच बेरोजगार व्यक्तीस रोजगाराच्या विविध संधी चालून येतील, परंतु नोकरीच्या मुलाखतप्रसंगी समाधीटपणाठेवणे अर्धे यशदायक ठरू शकेल.
कुंभ : पर्यटनासह धार्मिक यात्रायोग घडेल. यात्रा सफलतेचीच ठरेल. सर्व क्षेत्रांत नशिबाची साथ मागे राहील. त्यामुळे सर्वत्र पुढचे पाऊल पुढेच राहून अपयशाचा सामना करावा लागणार नाही.
मीन : वाहन पिडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालवताना सर्व रस्ता आपलाच आहे, असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरेल. सावधानता ठेवणेच विशेष अपायकारक स्वरूपाचेच सिद्ध होऊ शकेल.
‘या’ उपायांनी दूर करा वास्तूतील नकारात्मकता