कापसाच्या भावात अद्याप सुधारणा नाहीच


Last Updated on December 15, 2022 by Vaibhav

गतवर्षीपेक्षा जास्त भाव मिळण्याची अपेक्षा

खामगाव जिल्ह्यात अधिक कापूस उत्पादन घेतले जाते. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे उत्पादनात घट आली असली तरी गतवर्षीपेक्षा यंदा कापसाला दर चांगला मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र, दरात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केलेली आहे. सुरुवातीला असमाधानकारक पाऊस, नंतर अतिवृष्टी या संकटाला सामोरे जाऊन शेतकन्यांनी कसेबसे कापसाचे उत्पादन थोड्या प्रमाणात वाढवले; पण यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला कापूस घरामध्ये साठवून ठेवला आहे. किमान दहा हजार रुपयांच्या पुढे भाव येईल, अशी अपेक्षा आहे.

मात्र, अजूनही कापूस दरात सुधारणा होत नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. गतवर्षी कापसाला १२ हजारांचा भाव मिळाल्याने बी-बियाणे, खते, काढणी, मळणी, मजुरीही मोठ्या प्रमाणात वाढली. शेतकऱ्यांनीही सढळ हाताने मजुरी दिली. मात्र, यंदा कापसाच्या दरात महिना होऊनही सुधारणा होत नसल्याने खरीप हंगामातील शेती खर्च निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. तर दुसरीकडे भाव आज ना उद्या वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला आहे.

हेही वाचा: तुम्हाला काय हवे शेळी, गाय की म्हैस? घरबसल्या मोबाइलवरून करा अर्ज !