बदले की आग..! महिलेने चप्पल फेकून मारली, साप ती घेऊन पळाला; एकदा पहाच…बदले की आग..!


Last Updated on November 25, 2022 by Piyush

साप पाहून अनेकजण घाबरतात. सोशल मीडियावर सापाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. घराच्या पायऱ्यांवर साप येत असल्याचे पाहून एका महिलेने त्याला घाबरवण्यासाठी चप्पल फेकून मारली. मात्र झाले उलटेच साप हीच चप्पल घेऊन पळून गेला आहे.

सापाने ती चप्पल तोंडात पकडली आणि ती घेऊन पळाला आहे. महिला ऐ…ऐ करत बसली होती. या घटनेचा व्हिडीओ आयएफएस अधिकाऱ्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे ते अद्याप समजलेले नाही.

हा व्हिडिओ IFS अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केला आहे. त्याने कॅप्शन लिहिले आहे की, साप आता या चपलाचे काय करणार आहे? त्याला पायही नाहीत. ही व्हिडिओ क्लिप आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिली आहे. यावर लोकही आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने तर बिहारचा साप असल्याचे सांगितले. इथले नेते आणि साप कधीच रिकाम्या हाताने जात नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

वाचा : नेहमी सरळ चालणाऱ्या मेंढ्यांचा कळप अचानक गोल-गोल फिरु लागला, गुढ उकलेना, शास्त्रज्ञांची झोप उडाली