नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली मंजुरी


Last Updated on December 24, 2022 by Vaibhav

नवी दिल्ली: नाकावाटे देण्यात येईल. येणाऱ्या कोविड लसीच्या वापराला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकने विकसित केलेली ही ‘इंट्रोनेजल कोविड’ लस १८ वर्षे वयावरील लोकांसाठी आहे. ‘को-विन’ अॅपमध्ये या लसीचा समावेश करण्यात आला असून खासगी केंद्रांवर ही लस उपलब्ध असेल. बूस्टर डोस म्हणून या लसीच्या वापराला मंजुरी देण्यात आली असल्या तिचा एकच डोस देण्यात चीनसह इतर देशांमधील कोरोना रुग्णसंख्येत होणारी मोठी वाढ लक्षात घेता सरकारने या लसीला मंजुरी दिली आहे.

‘बीबीव्ही १५४’ असे या लसीचे नाव आहे. देशाच्या औषधी महानियंत्रकाने नोव्हेंबर महिन्यातच या लसीचा बूस्टर डोस म्हणून वापर करण्यास मंजुरी दिली होती. कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लसीचे डोस घेतलेले लोक या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीचा हिटरोलोगस ( आधी घेतलेल्या लसींपेक्षा वेगळी लस ) बूस्टर डोस घेऊ शकतात. लसीकरण नोंदणी संकेतस्थळावर ही लस ‘इनकोव्हॅक’ नावाने ओळखली जाईल. सध्या ही लस खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असेल. लवकरच तिचा राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहिमेत समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

हैदराबादच्या भारत बायोटेकने वॉशिंग्टन विद्यापीठासोबत विकसित केलेल्या या लसीची तीन टप्प्यांमध्ये चाचणी करण्यात आली होती. तीनही टप्प्यांमध्ये परिणामकारक निष्कर्ष आल्याचे भारत बायोटेकने सांगितले. या लसीची निर्मिती आणि चाचणीसाठी सरकारने निधी दिला होता. ही लस नाकावाटे श्वसनमार्गात जाऊन तेथेच विषाणूला अटकाव करते. या लसीसाठी इंजेक्शनची गरज नाही. त्यामुळे तिचे व्यवस्थापन, वितरण सुलभ आहे. ही लस देण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षणाचीही गरज नाही. लसीकरणासंदर्भातील केंद्र सरकारच्या सल्लागार समूहाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोडा यांनी ही नाकावाटे देण्यात येणारी लस भारताचे संशोधन व विकास कौशल्याचे उदाहरण असल्याचे कौतुक केले.

हेही वाचा: केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतली राज्यांची आढावा बैठक, राज्यांना सतर्क राहण्याचे केंद्राचे निर्देश