Soybean Rate: लवकरच वाढणार सोयाबीनचे दर, काय आहे कारण? वाचा सविस्तर


Last Updated on December 7, 2022 by Piyush

पुणे : गेल्या काही दिवसांपासून देशात सोयाबीनचे दर (Soybean Rate) प्रतिक्विंटल 300 ते 500 रुपयांनी खाली आले. ते दर आजपर्यंत दबावाखाली आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र आता सोयाबीन उत्पादकांना (Soybean Producer) दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जैवइंधनामध्ये पाम तेलाचा वापर वाढवण्याची तयारी इंडोनेशियाने सुरू केली आहे. त्यामुळे सोयाबीनच्या दरात प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपयांनी सुधारणा होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात आज काही सुधारणा दिसून आली. सोयाबीनचे वायदे जवळपास 1 टक्क्यांनी वाढून $14.48 प्रतिबुशेल्सवर गेले होते. सोया तेलाच्या वायद्यांमध्ये सुमारे दीड टक्क्यांची वाढ झाली. सोया तेलाचे वायदे आज 63.43 सेंट प्रति प्रतिपाऊंडवर पोचले होते. गेल्या आठवड्यात सोया तेलाचे भाव सुमारे 11 टक्क्यांनी घसरले होते. मात्र किमान पातळीवरून सोयातेलाच्या दरात (Soybean oil rates) आता सुधारणा दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. सोयापेंडच्या दरात सुमारे दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोयापेंडचे वायदे आज प्रति टन $433.35 वर बंद झाले. देशात सोयाबीन नरमल्याने सोयापेंडचे भावही खाली आले आहेत. म्हणजेच एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे भाव वाढत आहेत. तर देशातील दर खाली आले आले. त्यामुळे देशातून सोयापेंड निर्यातही वाढली आहे.

सोयाबीन दर किती वाढतील?

सध्याची परिस्थिती बघता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयातेलाचे किमती वाढण्यास काही घटक अनुकूल आहेत. सोयाबीनच्या भावात प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपयांनी वाढ होऊ शकते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/12/2022
कारंजाक्विंटल3500507554655290
तुळजापूरक्विंटल150500053505200
नागपूरलोकलक्विंटल879452053105113
अकोलापिवळाक्विंटल4197470058005350
यवतमाळपिवळाक्विंटल877500054355217
पैठणपिवळाक्विंटल30467651315000
जिंतूरपिवळाक्विंटल183467554005275
देउळगाव राजापिवळाक्विंटल30350053005000
तळोदापिवळाक्विंटल25540056505500
पाथरीपिवळाक्विंटल51510053005250
पालमपिवळाक्विंटल32545056005500
पांढरकवडापिवळाक्विंटल43534053905360
उमरखेडपिवळाक्विंटल70520054005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल400520054005300

वाचा : PM Kisan Yojana: …तर लाखो शेतकऱ्यांचे अनुदान होणार बंद