Last updated on January 10th, 2022 at 12:40 pm
माणसांनी शिवार फुलणार, आस्वाद पंचपक्वान्नांचा
लातूर: मृग नक्षत्रातील खरीप पेरणीपासून सातवी अमावस्या म्हणजे वेळा अमावस्या शेतकरी कुटूंबात वेळा अमावस्येचे वेगळे महत्व, या दिवशी शेतातील -पांडवांचे व लक्ष्मीपूजन केले जाते. प्रतिवर्षी वेळा अमावस्येला पिके बहरलेली व शिवार हिरवेगार असते परंतु, यंदा वरुणराजाने कृपा दाखविल्याने जिल्ह्यात शिवार हिरवंगार झालं आहे. यामुळे रबीचा मोठ्याप्रमाणात झाला आहे.
वर्षांचा सण असल्याने शेतकरी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी व वेळा आमवस्या साजरा करण्यासाठी शेतकरी कुटूंबात उत्साह दिसून येत आहे. वेळा अमावस्येला शहरात अघोषित बंद असतो. यंदा भरपूर पाणी उपलब्ध असून, हिरवगार शिवार माणसांनी फुललेला दिसून येणार आहे. वेळा अमावस्येदिवशी जे पंचपक्वान्न खाल्ले जाते. ते शरिरासाठी हिवाळा या ऋतुमध्ये पाचक असते. मागील काही वर्षांपासून शेती अन् शेतकरी संकटात आहे. त्यामुळे बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले आहे. यंदा मृग नक्षत्रापासून भरपूर झाला. अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिके गेली, अतिवृष्टीतून शिल्लक राहिलेल्या पिकाची काढणी केली. पण, उतारा मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्याची भिस्त रबीवर आहे.
वेळोवळी पाऊसच झाल्याने जिल्ह्यात हरभरा, गहू, ज्वारी, करडई व अन्य पिकांचा मोठ्याप्रमाणात पेरा झाला. खरीप हंगामातील तुरीचाही खराटा झाला आहे. अनेक संकट आले. तरी सर्व सण-उत्सव मोठ्या हिंमतीने बळीराजा साजरा करतो. मृग नक्षत्राच्या पेरणीपासून येणारी सातवी अमावस्या म्हणजे वेळा अमावस्या. या दिवशी बळीराजा कुटूंबासह शेतावर आपल्या मित्र व नातेवाईकांना निमंत्रण देऊन जेवण देतो. विशेष म्हणजे काळ्या आईची पूजा केली जाते. या दिवशी पांडवांची पूजा केली जाते. त्यानंतर मातीची लक्ष्मीची मूर्ती तयार करून कडव्याच्या कोपीत मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
बळीराजा जोडीने लक्ष्मीची पूजा करुन शिवार पिकू दे, असे साकडे घालतो. ती प्रथा अनेक वर्षांपासून आजही पाळली जाते. या दिवशी जे पदार्थ बनविले जातात, ते सर्व उकडलेले असतात. त्यामुळे वेळा अमावस्येदिवशी कितीही खाल्ले तरी अपचन वा पोटदुखीसारखे आजार होत नाहीत. कारण हिवाळ्यामध्ये उकडलेले पदार्थ खाणे हे शरीरासाठी पाचक असते. वेळा अमावस्येला भज्जी, गोड पोळी, उंडे, अंबिल, बाजरीची भाकरी, धपाटे, भात, आंबट भात, खीर, तिव्बची पोळी आदींसह पंचपक्वात्रांचा आस्वाद आज शेत शिवारात घेतला जाणार आहे. परंतु यंदा अनेक वर्षांनंतर शिवारात बहरलेली पिके व हिरवेगार शिवार मन प्रफुल्लित करणारे आहे. शिवार यंदा पिकांनो अन् माणसांनी बहरलेला दिसून येईल.
महिलेचे शोषण; डॉक्टरला तीन दिवसांची पोलीस कोठडी